Breaking news
12-07-2018 : 10:35:16

दरवाढीचा शॉक; महावितरणची वीज महागणार?

10-07-2018 : 10:30:13

पावसाचा ‘रेन अॅलर्ट’, ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा

10-07-2018 : 10:27:23

स्थापन होण्याआधीच जिओ इन्स्टिटयूट ठरली देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था

10-07-2018 : 10:27:05

विधान परिषदेच्या ११ जागांची निवडणूक बिनविरोध

10-07-2018 : 10:26:11

अनुराधा पौडवाल यांचा ब्रिटनच्या संसदेत सन्मान!

09-07-2018 : 01:46:11

तर पन्नाशी उलटलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकार नारळ देणार

09-07-2018 : 01:45:13

‘चले जाव’ मुळे इंग्रज गेले नाहीत: सुमित्रा महाजन

07-07-2018 : 10:25:53

दुसऱ्या टी20 क्रिकेट सामन्यात इंग्लंडकडून भारताचा 5 गडी राखून पराभव

07-07-2018 : 10:24:57

शेतकऱ्यांना मिळणार दीडपट हमीभाव, पण हमीभावाचं गणित असतं तरी कसं?

07-07-2018 : 10:24:25

पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना १० वर्षाचा तुरुंगवास

07-07-2018 : 10:23:55

फिफा वर्ल्डकप: ब्राझीलला हरवून बेल्जियम उपांत्य फेरीत

06-07-2018 : 10:36:57

महिनाभरानंतर पेट्रोल, डिझेल पुन्हा महाग

03-07-2018 : 10:55:47

पत्रकार रजत शर्मा "डीडीसीए"चे अध्यक्ष

03-07-2018 : 10:54:20

नागपुरात बुधवारपासून पावसाळी अधिवेशन

03-07-2018 : 10:54:03

राजस्थान सरकारने गुर्जर समाजासह इतर पाच जातींना अतिमागास प्रवर्गांतर्गत १ टक्का आरक्षण लागू केले

प्रेक्षकांच्या भेटीला एक होतं पाणी"ची खास झलक

Image


मुंबई प्रतिनिधी - या चित्रपटातील बालकलाकार चैत्रा भुजबळ हिच्या वाढदिवसाचे औचित्य साधत टीझर रिलीज करण्यात आला. व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज, प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ, विजय तिवारी निर्मित आणि रोहन सातघरे दिग्दर्शित "एक होतं पाणी" हा चित्रपट पाणी समस्येसारख्या जवलंत सामाजिक विषयावर भाष्य करतो.


अलीकडेच "एक होतं पाणी" चित्रपटाने " अंबरनाथ चित्रपट महोत्सवा"मध्ये यंदा ६ नामांकने मिळवलेली त्यातील २ पुरस्कारांवर म्हणजेच "सर्वोत्कृष्ट कथा-आशिष निनगुरकर" आणि "सर्वोत्कृष्ट बालकलाकार चैत्रा भुजबळ" या पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवण्यात यशस्वी झाले. तसेच नोएडा येथे संपन्न झालेल्या 6 व्या नोएडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये "दखलपात्र ज्युरी पुरस्कार" मिळाला. दर्जेदार निर्मितीमूल्य, उत्तम कथानक आणि प्रतिभावान कलाकार यांचे समीकरण एकदा जुळून आले की सुजाण रसिक-प्रेक्षकांच्या कौतुकाची थाप ही ठरलेली. "एक होतं पाणी"च्या बाबतीत नेमकी हीच बाब विशेष उल्लेखनीय ठरते आहे.

आशिष निनगुरकर यांच्या लेखणीतून साकारलेला हा विषय समाजाच्या डोळ्यांत जळजळीत अंजन घालणारा असून सद्यस्थितीला धरून आहे.

"एक होतं पाणी" या चित्रपटात हंसराज जगताप, उपेंद्र दाते, अनंत जोग, जयराज नायर, गणेश मयेकर, रणजित जोग, श्रिया मस्तेकर, रणजित कांबळे, त्रिशा पाटील, शीतल कल्हापुरे, शीतल शिंगारे, आनंद वाघ, नाना शिंदे, अनुराधा भावसार, डॉ राजू पाटोदकर, राधाकृष्ण कराळे, दिपज्योती नाईक, बालकलाकार चैत्रा भुजबळ आदि कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळतील. या चित्रपटाचे छायाचित्रण योगेश अंधारे यांनी केले असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
एका दुष्काळग्रस्त गावाची गोष्ट सांगणारा "एक होतं पाणी; हा चित्रपट प्रत्येकाने पाण्याचा प्रश्न गंभीर होईपर्यंत वाट न पाहता पाणी वाचवले पाहिजे असा मौलिक संदेश देतो.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh