Breaking news
12-07-2018 : 10:35:16

दरवाढीचा शॉक; महावितरणची वीज महागणार?

10-07-2018 : 10:30:13

पावसाचा ‘रेन अॅलर्ट’, ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा

10-07-2018 : 10:27:23

स्थापन होण्याआधीच जिओ इन्स्टिटयूट ठरली देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था

10-07-2018 : 10:27:05

विधान परिषदेच्या ११ जागांची निवडणूक बिनविरोध

10-07-2018 : 10:26:11

अनुराधा पौडवाल यांचा ब्रिटनच्या संसदेत सन्मान!

09-07-2018 : 01:46:11

तर पन्नाशी उलटलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकार नारळ देणार

09-07-2018 : 01:45:13

‘चले जाव’ मुळे इंग्रज गेले नाहीत: सुमित्रा महाजन

07-07-2018 : 10:25:53

दुसऱ्या टी20 क्रिकेट सामन्यात इंग्लंडकडून भारताचा 5 गडी राखून पराभव

07-07-2018 : 10:24:57

शेतकऱ्यांना मिळणार दीडपट हमीभाव, पण हमीभावाचं गणित असतं तरी कसं?

07-07-2018 : 10:24:25

पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना १० वर्षाचा तुरुंगवास

07-07-2018 : 10:23:55

फिफा वर्ल्डकप: ब्राझीलला हरवून बेल्जियम उपांत्य फेरीत

06-07-2018 : 10:36:57

महिनाभरानंतर पेट्रोल, डिझेल पुन्हा महाग

03-07-2018 : 10:55:47

पत्रकार रजत शर्मा "डीडीसीए"चे अध्यक्ष

03-07-2018 : 10:54:20

नागपुरात बुधवारपासून पावसाळी अधिवेशन

03-07-2018 : 10:54:03

राजस्थान सरकारने गुर्जर समाजासह इतर पाच जातींना अतिमागास प्रवर्गांतर्गत १ टक्का आरक्षण लागू केले

आनंदी गोपाळ’ या चित्रपटातून आनंदीबाई जोशीचा प्रवास उलगडणार

Image

मुंबई : भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान ज्या आनंदीबाई जोशी यांनी कमावला त्यांचा प्रवास मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. समीर विद्वांस दिग्दर्शित आगामी ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटातून हा प्रवास उलगडणार असून या चित्रपटाचा नवीन ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात ललित प्रभाकर गोपाळरावांची भूमिका साकारत असून भाग्यश्री मिलिंद आनंदीबाई जोशींच्या भूमिकेत दिसतेय.

एका ध्येयवेडय़ा जोडप्याची गोष्ट म्हणजे ‘आनंदी गोपाळ’. १८८२ मध्ये जेव्हा स्त्रीने उंबरठा ओलांडणे समाजमान्य नव्हते तेव्हा वयाच्या अठराव्या वर्षी सातासमुद्रापार बोटीने परदेशी जाणारी पहिली स्त्री म्हणजे डॉ. आनंदीबाई जोशी. भारतातच नव्हे तर परदेशातही कुचेष्टा, अवहेलना, अपमान सहन करत वैद्यकीय शिक्षण जिद्दीने पूर्ण करणा-या आनंदीबाई यांना गोपाळराव यांची समर्थ साथ लाभली.

गोपाळरावांनी आनंदीबाईंना मराठी, इंग्रजी आणि संस्कृत भाषा कशी लिहितात आणि वाचतात त्याचे शिक्षण दिले. वयाच्या ९ व्या वर्षी आनंदी यांचे गोपाळरावांशी लग्न झाले. वयाच्या १४व्या वर्षी प्रसूतीच्या वेळी वैद्यकीय संसाधने उपलब्ध नसल्याने आनंदीबाईना त्यांच्या पहिल्या बाळाला गमवावे लागले. त्याच क्षणाला त्यांनी डॉक्टर होण्याचे ठरवले. आनंदीबाईंचा हा प्रेरणादायी प्रवास चित्रपटाच्या माध्यमातून रूपेरी पडद्यावर उलगडभार आहे.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh