मुंबई प्रतिनिधी - सध्या सगळीचकडे चर्चा आहे ती फक्त एकाच चित्रपटाची आणि">
Breaking news
10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

अभिजीत खांडकेकर साकारणार मी पण सचिन" मध्ये भूमिका

Image

अभिजीत खांडकेकर साकारणार मी पण सचिन" मध्ये भूमिका

मुंबई प्रतिनिधी - सध्या सगळीचकडे चर्चा आहे ती फक्त एकाच चित्रपटाची आणि तो म्हणजे "मी पण सचिन". क्रिकेट वर आधारित असलेल्या या चित्रपटात स्वप्नांचा माग घेणारी एक उत्कंठा वर्धक कहाणी दाखवण्यात आली आहे. अशा या चित्रपट आपल्या सगळ्यांचा लाडका अभिजीत खांडकेकर राजा देशमुख या एका वेगळ्या भूमिकेतून आपल्या समोर येणार आहे. या चित्रपटात तो पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटातील नायकासारखे या राजा देशमुखचे देखील एक ध्येय असते. ते ध्येय गाठण्यासाठी तो काय करतो. आणि नायकाच्या स्वप्नामध्ये कशी आडकाठी बनत जातो असा अभिजीतच्या भूमिकेचा सिनेमातील प्रवास आहे. जेव्हा या भूमिकेसाठी विचारणा झाली तेव्हा अभिजीत हि भूमिका करण्यासाठी उत्सुक होता. पण त्याच्यासमोर मोठा प्रश्न होता तो क्रिकेटचा. कारण अभिजीत क्रिकेट जास्त खेळत नाही आणि बघतही नाही. पण या भूमिकेसाठी त्याने क्रिकेट खेळण्यास आणि क्रिकेटचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. अभिजीत त्याच्या या चित्रपटातील अनुभवाबद्दल सांगतो कि " मला या चित्रपटा बद्दल विचारणा झाली तेव्हा पासून मी खूपच जास्त उत्सुक होतो. कारण मराठीत तसे पाहिले तर खेळावर आणि त्यातही क्रिकेटवर जास्त चित्रपट होत नाही. जेव्हा हा चित्रपट मला ऑफर झाला तेव्हा तर मी खूप जास्त आनंदित होतो. मी एका खूप चांगल्या चित्रपटाचा भाग होणार होतो याचा अभिमान तर होताच पण तेवढे दडपण सुद्धा होते कारणं सिनेमाचा विषय तर मला आवडला होता, खरे आव्हान होते ते माझ्या क्रिकेट कौशल्याचे. कारण मला क्रिकेट येत नव्हते. पण श्रेयशने स्वतः जातीने माझ्याकडून अनेक दिवस क्रिकेट प्रॅक्टिस करून घेतली. अनेक बारकावे शिकवले. त्यानंतर मग आम्ही शूटिंगला सुरुवात केली. मी ह्या चित्रपटात जे काही क डिग्री शकलो त्याचे संपूर्ण श्रेय मी या सिनेमाच्या टीमलाच देईन. अशा काही भूमिका कलाकारांना क्वचितच करायला मिळतात ज्यामुळे एक कलाकार म्हणून आम्ही समृद्ध होतो. तशी ही राजा देशमुखची भूमिका आहे".
आता एवढे या चित्रपटाबद्दल ऐकल्यावर, वाचल्यावर सिनेमा पाहण्याची उत्सुकता अधिकच वाढायला लागली आहे. इरॉस इंटरनॅशनल, एव्हरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत आणि गणराज असोसिएट निर्मित "मी पण सचिन" चित्रपट येत्या १ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. नीता जाधव, संजय छाब्रिया, निखिल फुटाणे आणि गणेश गीते या चित्रपटाचे निर्माता आहे. श्रेयश जाधव यांनी या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. श्रेयश या चित्रपटातून दिग्दर्शनात पाऊल टाकत आहे. इरॉस इंटरनेशनलद्वारे "मी पण सचिन" या चित्रपटाचे जागतिक स्तरावर देखील वितरण केले जाणार आहे.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh