Breaking news
20-11-2017 : 10:03:05

लवकरच स्विस बँकेतील काळ्या पैश्याची माहिती मिळण्याची शक्यता

20-11-2017 : 10:02:26

पृथ्वीवर वीस वर्षांत झालेल्या बदलांच्या चित्रणात ‘नासा’ला यश

20-11-2017 : 10:02:15

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल यांना उच्चपदस्थ नोकरशहांपेक्षा कमी वेतन

18-11-2017 : 11:16:39

देशाची राजधानी नागपूरला हलवा : श्री श्री रविशंकर

18-11-2017 : 11:15:41

2 भारतीय सैनिकांवर फ्रान्समध्ये 100 वर्षांनी झाले अंत्यसंस्कार

18-11-2017 : 11:15:18

भारत-चीन सीमेवर ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप

17-11-2017 : 10:18:17

भाजपा राहुल गांधींच्या लोकप्रियतेने भयभीत, राजीव गांधींना बदनाम करण्याचे कारस्थान - शरद पवार

16-11-2017 : 05:20:36

दूरसंचार, बँकींग क्षेत्रातील ८० हजार नोक-यांवर गदा!

13-11-2017 : 10:22:54

क्तक़्क़क् बॅंकने ग्राहकांंसाठी केले ३ मोठे बदल

13-11-2017 : 10:15:33

वेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून 25 हजार रूपयांचे प्रोत्साहन

13-11-2017 : 10:14:24

इराण-इराक सीमा भागात मोठा भूकंप, १२९ नागरिकांचा मृत्यू

13-11-2017 : 10:13:19

राजस्थानातील डॉक्टरांच्या संपाला राज्यातील सरकारी डॉक्टरांचा पाठिंबा

13-11-2017 : 10:10:48

चार वर्षात डेबिट-क्रेडीट कार्ड, ॠच्र्ग् इतिहासजमा : नीती आयोग

13-11-2017 : 10:08:32

विद्यापीठ नामांतराविरोधात आज सोलापूर बंदची हाक

11-11-2017 : 10:14:42

शेतीचे शिक्षण शाळेतून देण्यात सरकार उदासीन

कृषी पर्यटन एक हरित संकल्पना

Imageपर्यटन क्षेत्राला सध्या प्रचंड मागणी आहे. जगभरातील उंचावणारी उत्पन्न मर्यादा, विविध देशांबद्दल, जागांबद्दल आणि माणसांबद्दल माणसाला असलेली मूलभूत उत्सुकता आणि धकाधकीच्या जीवनाची गरज म्हणून लोकांचा पर्यटनाकडे ओढा वाढत आहे. याचमुळे कृषी पर्यटनात लोकांचा रस वाढतो आहे. ज्यात रोजगाराच्या खूप संधी आहेत.

पर्यटनाच्या एका संकल्पनेने हल्ली व्यवसाय म्हणून जम धरलाय, त्याला ‘एक्स्पिरिअन्स टुरिझम’ म्हणजे ‘अनुभवात्मक पर्यटन’ म्हणतात. एखाद्या जागी फक्त जाऊन येण्यापेक्षा तिकडचे जीवन, पद्धती प्रत्यक्षात अनुभवण्याकडे पर्यटकांचा ओढा आहे. माणूस हा खेडय़ातून शहराकडे गेला आहे. आज बहुतांश उत्पन्न कमावणारा गट शहरातच जन्मलेला असला तरी आपले आजोबा, खापरपणजोबा कसे जीवन जगायचे हे त्याला अनुभवायला आवडते. ज्यांना गाव नाही त्यांना गावातील जीवन पाहायला आवडते. यातूनच कृषी पर्यटनाची क्रेझ निर्माण झाली आहे. ती ओसरणार नाहीच. त्यामुळे कृषी पर्यटन व्यावसायिक म्हणून आपण काय देतोय यावर आपल्याकडे पर्यटकांचा ओघ कसा असेल हे अवलंबून आहे. असा हा अतिशय सुंदर आणि आव्हानात्मक व्यवसाय-कृषी पर्यटन!

माणूस हजारो वर्षापासून शेती करतो आहे आणि चिखलाशी त्याची नाळ जन्मजन्मांतरीची. कितीही काचेच्या चकचकीत ऑफिसमध्ये राहून कॉम्प्युटरच्या जंजाळात तो काम क डिग्री लागला तरी त्याला मोकळ्या हवेचे आणि या चिखलाचे अप्रूप नेहमीच राहणार. नेमकी हीच गरज कृषी पर्यटन पूर्ण करते. पर्यटकाला गावाच्या वातावरणाची जाणीव देऊन, त्याला शेतीच्या हिरवळीने थंड करून दोन- तीन दिवसांचा न विसरता येणारा अनुभव दिलात की तो पर्यटक पुन्हा तुमच्याकडे येणारच आणि आपल्या मित्रांनाही घेऊन येईल. तुमच्याकडे गावाला जाऊन काही करण्याची इच्छा असेल, तर कृषी पर्यटन तुम्हाला एक उत्तम पर्याय बहाल करते.

आता कृषी पर्यटनासाठी काय गरज आहे ते आपण पाहू – ठरावीक लक्ष्य
कुठल्याही व्यवसायाची पहिली गरज म्हणजे आपले मार्केट काय आहे ते समजणे. ते समजले की त्यांच्या गरजा समजू शकतात. कृषी पर्यटक हा शहरात राहणारा किंवा अगदी विदेशातील एखादा पर्यटक आहे. त्याला गावातील निर्मळ वातावरणाचा अनुभव घ्यायचा आहे. आपले मार्केटिंग असे असावे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचू. रोजच्या कामाची दगदग, ताण लोकांना अधिक असतो. त्यामुळे नेहमीच्या आयुष्यातून अशा जगात येण्याची गरज त्यांच्यापेक्षा अधिक कोणाला असेल बरे! ते दोन-तीन दिवस त्याला कुठली काळजी येऊच नये ही तुमची जबाबदारी समजा. बैलगाडी सर, माकडवाल्याचे खेळ, सकाळी वासुदेव, रात्री भजनं, सकाळी व रात्री खास गावाकडचं जेवण अशा खास गावरान गोष्टींचा भरणा करा. त्यामुळे पर्यटकाला अधिकाधिक अनुभव घेता येईल. तुमच्या शेतातील सर, त्यांना थोडी कामे क डिग्री द्या, तळ्यातील मासे पकडू द्या, या गोष्टींचा अनुभव त्यांना घेऊ द्या.

जागा
तुम्हाला शेत तयार करायचे आहे आणि त्याभोवताली पर्यटनाच्या सुविधाही द्यायच्या आहेत. त्यामुळे तुमच्याकडची जागा ही शेतीसाठी पूरक असावी. साधारणत: २-५ एकर जागा तुमच्याकडे असावी. अर्थात ती सरळ रेषेत असावी असे नाही. तुम्हाला या जागेचा वापर शेतीसाठी नाही तर शेती सदृश्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी करायचा आहे. जागा उंच-सखल असली किंवा डोंगराळ असली तरीही कल्पकतेने त्याचा वापर केला जाऊ शकतो किंवा तुमचे स्वत:चे शेत त्याआधीच असेल तरी हरकत नाही.

कृषी पर्यटन
तुम्ही जागेचे विभाजन करून थोडय़ा भागात भातशेती, थोडय़ा भागात भाज्या आणि फळझाडांची लागवड क डिग्री शकता. त्यामुळे शेतातील ताजे कृषी उत्पादन तुम्ही जेवणाला वाप डिग्री शकाल. जागा पाच एकर किंवा तत्सम असेल तर तुम्ही ब-यापैकी मोठी शेती क डिग्री शकता. थोडय़ा भागात तुम्ही गोडय़ा पाण्यातील मत्स्यशेती आणि थोडय़ा जागेत कुक्कुटपालन क डिग्री शकता. दुग्धव्यवसाय आणि शेळीपालन यामध्ये शेणाची किंवा विष्ठेची घाण निर्माण होत असल्याने पर्यटकांच्या राहण्याच्या जागेपासून लांब तुम्ही ते क डिग्री शकता. मात्र, शक्यतो या सर्व गोष्टींचा वापर हा तुमच्या पर्यटनास वातावरण निर्मितीसाठी आणि फार तर पर्यटकांच्या गरजेपुरता हवा, अन्यथा हे व्यवसाय जास्त होतील आणि पर्यटनाकडे दुर्लक्ष होईल. हे सर्व प्रकार न करता संपूर्ण जागेवर फक्त फुलशेती सुद्धा क डिग्री शकता. पाश्चिमात्य देशात लांबच लांब पसरलेल्या झेंडूच्या किंवा गुलाबाच्या फुलांच्या बागा असतात. त्यामुळे ती जागा खूप सुंदर दिसते.

जंगल पर्यटन
तुमच्याकडील जागा डोंगराळ असेल किंवा डोंगराच्या जवळ असेल तर वर म्हटल्यापेक्षा अतिशय वेगळे असे जंगल पर्यटन तुम्ही क डिग्री शकता. यात तुम्हाला पर्यटकांना जंगलात आल्याचा अनुभव द्यायचा आहे. त्यामुळे तुम्ही बांबू, खैर असे मोठे मोठे वृक्ष लावा. त्याचबरोबर औषधी वनस्पतींची लागवड क डिग्री शकता. बांबू तीन वर्षात प्रचंड प्रमाणात उत्पादन देतात. त्यामुळे तो फायदेशीर वृक्ष आहे. याचबरोबर तुम्हाला ससे, हरिण असे प्राणी पाळता येतील जेणेकरून जंगलासारखं वातावरण निर्माण होईल. एखाद्या ठिकाणी कृत्रिम धबधबा तयार करा. मात्र एका गोष्टीची काळजी घ्या की यातून पर्यटकांना कुठेही धोका पोहोचणार नाही.

विशेष काळजी
हा व्यवसाय अतिशय जोखमीचा व्यवसाय आहे. कारण यात तुमच्या पर्यटकांची जबाबदारी आणि काळजी तुमच्यावर असते. त्यामुळे अनेक गोष्टींची काळजी घेण्याची गरज असते. कृषी पर्यटनात विशेष घ्यायची काळजी म्हणजे पर्यटकांची सुरक्षितता. पर्यटकांना कधीही असुरक्षित किंवा भीती वाटणे हा धोक्याचा इशारा आहे. गावातील आयुष्यातील शांतता, निरागसता आणि निवांत जीवनपद्धती याचा त्यांना पुरेपूर आनंद घेऊ द्या. मात्र कुठेही गावातील गूढ वातावरण, भुतांची भीती, साप, विंचू आणि जंगली प्राणी यांची भीती लोकांना सतावणार नाही याची काळजी घ्या. याचबरोबर गावातील राजकारण, काही कपटी माणसे यांच्यापासून पर्यटकांची काळजी घ्या. एक उत्तम कृषी पर्यटन केंद्र बनवण्यासाठी तुमच्याकडे कौला डिग्री घरं, बैलगाडी, धबधबा किंवा ओहोळ, झरा, तळं, शेत, नदी, विहीर, भरपूर झाडी, गावरान खाद्यपदार्थाची सोय इ. गोष्टी आसपास असणं अत्यंत आवश्यक आहे.

तुमच्या पर्यटक संख्येवर तुमचा नफा अवलंबून असतो. कृषी पर्यटन हा गावात विशेषत: कोकणात अतिशय यशस्वी होईल, असा व्यवसाय आहे. त्यासाठी फक्त चिकाटी आणि आपल्या केंद्राचे उत्तम मार्केटिंग करण्याची हातोटी गरजेची आहे आणि त्यातही सतत कुठल्या प्रकारे आणि कोण कोणत्या पर्यटकांना आपण आकर्षित क डिग्री शकतो हे सतत शोधत राहणे गरजेचे आहे. तुम्ही तरुण असाल आणि तुम्हाला चार-चौघांपेक्षा वेगळे आणि गावात काही करण्याची इच्छा असेल तर कृषी पर्यटनाचा व्यवसाय तुम्हाला साद घालत आहे.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh