Breaking news
07-03-2018 : 06:24:26

"फोर्ब्ज"च्या अब्जाधीशांच्या यादीत ट्रम्प 222 क्रमांकांनी गडगडले

04-03-2018 : 10:27:14

महाराष्ट्रातच राहा! मुलानेच घातली नारायण राणेंना गळ

04-03-2018 : 10:26:55

राज्यात यंदा समाधानकारक पावसाची शक्यता-हवामान खाते

04-03-2018 : 10:26:43

संत तुकाराम महाराजांचा 369वा बीज सोहळा देहुत संपन्न

16-02-2018 : 09:34:55

देशातील रबर उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर, ‘कार्बन ब्लॅक’चा तुटवडा

15-02-2018 : 10:42:52

श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ आलमला या संस्थेला कै. मातोश्री गुंडाबाई भातांब्रे स्मृती पुरस्कार मिळाला, या पुरस्काराने बसवराज धाराशिवे श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिवांना सन्मानीत करताना पंजाबचे मा. राज्यपाल श्री शिवराजजी पाटील चाकुरकर, ह.भ. प. गहिनीनाथ महाराज, मा. खा. गोपाळराव पाटील, डॉक्टर भातांब्रे, शैलेश पाटील, लोहारे गुरुजी, मोतीपवळे सर आदी.....

14-02-2018 : 10:49:33

नाशिकमधून लढण्याचा भाजपचा आग्रह राणेंना अमान्य

14-02-2018 : 10:49:01

समविचारी पक्षाबरोबरच राहण्याची राष्ट्रवादीची भूमिका- शरद पवार

10-02-2018 : 10:44:28

राज्यभरातील दस्त नोंदणी, आधार केंद्र ठप्प

10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

10-02-2018 : 10:22:37

आलमला येथील ब्ल्यु बर्ड ज्युनिअर सायन्स कॉलेजला क्रॉपसायन्सची मान्यता

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

संधी अग्नी शामक दलात

Image


आग, एका छोट्याशा ठिणगीचे भयंकर आगीत रुपांतर होते अन् अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात आणि याचे कारण आपला निष्काळजीपणाच असतो. आज आपण सकाळी उठल्यावर वृत्तपत्र हातात घेतल्यावर आगीचे एखादे तरी वृत्त दिसतेच आणि त्याची विदारकता पाहून मन विचलित होते. शॉर्टसर्किट, सिलिंडरचा स्फोट, अस्वच्छता हीच याची प्रमुख कारणे आहेत. घरांमध्ये, बंगल्यांमध्ये सर्रासपणे आग लागणार्‍या वस्तूंचा वापर केला जातो. आपली मानसिकता, या गोष्टी बदलण्याची आज आवश्यकता आहे. त्याचबरोबर आगी बद्दलचे अपुरे ज्ञान याच्या भयानकतेला खतपाणी घालते.

याकरिता महाराष्ट्र शासनाने फायर व सेफ्टी या विषयावर डिप्लोमा कोर्सेससुद्धा काढले आहेत. नागपूर, औरंगाबाद व कोल्हापूर या ठिकाणी या विषयावरील प्रशिक्षण देणार्‍या कॉलेजना मान्यतासुद्धा देण्यात आली आहे. ही कॉलेजीस आग व औद्योगिक सुरक्षा या विषयावर प्रशिक्षण व लेखी स्वरुपात ज्ञान देतात. ज्यांना सामाजिक कार्य, धाडस व देशासाठी काही करण्याची आवड आहे त्यांच्यासाठी हे कोर्स म्हणजे एक वरदान आहे. दलसेना, नौसेना व वायू सेनानंतर फोर्थ लाईन्स ऑफ डिफेन्स म्हणून अग्‍निशमन दलाला मान्यता आहे. या क्षेत्रातील विद्यार्थी फायर ऑफिसर, सेफ्टी ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. आज बी. ए., बी. कॉम. करून अनेक विद्यार्थी नोकरीविना घरी बसून आहेत. अशा विद्यार्थ्यांना हे कोर्स करिअर घडविण्याकरिता नक्‍कीच एक वरदान आहे. बारावी, बी. ए., बी. कॉम, डिप्लोमा डिग्री झालेल्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात करिअर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळांतर्गत डिप्लोमा इन फायर सर्व्हिस इंजिनिअरिंग, अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी असे अल्प मदतीचे कोर्स तयार केले आहेत. अग्‍निशमन व सुरक्षा या विषयाची दिवसेंदिवस वाढत चाललेली गरज व या क्षेत्रात वाढता रोजगार लक्षात घेता हे कोर्सेस विद्यार्थ्यांना भविष्याच्या द‍ृष्टीने नक्‍कीच लाभदायक ठरणार आहेत. वाढत्या आधुनिकीकरणामुळे होणारे संभाव्य धोके लक्षात घेऊन एक नवीन वाटचाल म्हणून आजच्या घटकेला अग्‍निशमन प्रशिक्षण व सुरक्षा अनिवार्य होत चालले आहे.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh