Breaking news
05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

26-01-2018 : 10:53:45

प्रजासत्ताकदिनी भेट ! पुण्यात 150 ठिकाणी मोफत वाय-फाय

26-01-2018 : 10:53:31

"पद्मविभूषण" , ‘पद्म’ पुरस्कारांमध्ये राज्याचे ११ मानकरी

हवाई दलातील करिअर संधी.

Image


प्रियांका जाधव

ऊर्जावान, तडफदार आणि उत्साही तरुणांंसाठी हवाईदलाचे क्षेत्र हे आश्‍वासक मानले जाते. आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी सदैव दक्ष असणार्‍या तरुणांची सैन्याच्या तिन्ही दलांना नेहमीच गरज असते. हवाई दलामध्ये करिअर करण्यासाठी कठोर परिश्रमांचीही आवश्यकता असते.

हवाई दलामधील निवड प्रक्रियेसाठी पुढील परीक्षा देणे आवश्यक असते. त्यामध्ये प्रॅक्टिकल टेस्ट, लेखी, फिजिकल आणि मेडिकल टेस्ट, सायकॉलॉजिकल टेस्ट, मुलाखत आणि गटचर्चा या वेगवेगळ्या चाचण्यांच्या माध्यमातून योग्य उमेदवार निवडले जातात. हवाई दलामध्ये सामील होण्यासाठी उमेदवारास नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमीची (एनडीए) परीक्षा देणे अनिवार्य आहे. तसेच विज्ञान शाखेमध्ये मॅथ्स आणि फिजिक्स या विषयांमध्ये बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच वयोमर्यादा साडे सोळा ते एकोणीस वर्षे एवढी आवश्यक आहे. त्याबरोबरच भारतीय नागरिकत्व असणेही गरजेचे आहे.
या परीक्षांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना एनडीएमध्ये तीन वर्षांचे आवश्यक प्रशिक्षण दिले जाते. या तीन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर उमेदवारांना एअरफोर्स अ‍ॅकॅडमीमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवले जाते.
हवाई दलामध्ये तीन वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होऊ शकते. फ्लाईंग ब्रँच, टेक्निकल ब्रँच किंवा ग्राऊंड ड्युटी ब्रँच.

फ्लाईंग ब्रँच ः या ब्रँचमध्ये विविध श्रेणीतील पायलटची निवड करून त्यांना प्रशिक्षित केले जाते. यामध्ये हेलिकॉप्टर पायलट, फायटर पायलट किंवा ट्रान्स्पोर्ट पायलटच्या स्वरुपामध्ये पदवी आणि पदव्युत्तरांना प्रवेश घेता येतो. पायलटचे प्रशिक्षण हे हैद्राबादपासून 43 कि.मी. दूर असलेल्या दंडीगल येथे असलेल्या एअरफोर्स प्रशिक्षण केंद्रामध्ये दिले जाते. या ठिकाणच्या अनुभवानंतर वेगवेगळ्या विभागांसाठी उमेदवारांची निवड केली जाते.

श्व्टेक्निकल ब्रँच ः एअरफोर्सची टेक्निकल ब्रँच ही अत्याधुनिक विमाने आणि शस्त्रे यांच्या योग्य संचालनास सुनिश्‍चित करत असते. विमानांचे मेंटेनस आणि सर्व्हिसिंग तसेच एयर फोर्सच्या स्टेशनवर कम्युनिकेशन किंवा सिग्नलशी येणार्‍या संबंधित समस्या सोडवण्यासाठी मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक विभागामधून एरोनॉटिकल इंजिनियर्सची नियुक्ती केली जाते.

ग्राऊंड ड्युटी ब्रँच ः या ब्रँचमध्ये व्यक्तिगत तसेच वेगेवगळ्या साधनांचे व्यवस्थापन केले जाते. या विभागामध्ये अनेक शाखा समाविष्ट असतात. यापैकी व्यवस्थापन शाखांचे अधिकारी साधनांचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करत असतात. याच ब्रँचमधील काही अधिकारी हे एअर ट्रॅफिक कंट्रोल किंवा फ्लाईट कंट्रोलर म्हणून काम करत असतात. याप्रमाणेच अकाऊंटच्या ब्रँचमध्येही अकाऊंटसंबंधी अनेक कामे केली जातात. तसेच लॉजिस्टिक्स विभागातील अधिकार्‍यांना कपड्यांपासून विमानातील वेगवेगळ्या सामानाचे व्यवस्थापन करावे लागते. एज्युकेशन विभागामध्ये हवाई दलातील सैनिकांना भविष्याच्या दृष्टिकोनातून योग्य प्रशिक्षण दिले जाते. हवामान विभागातील अधिकारी हे विमानाच्या सुरक्षित उड्डाणासाठी पायलटला मार्गदर्शन करत असतात.

या खेरीज हवाईदलामध्ये इतरही काही विभागांमध्ये अधिकारी म्हणूनही काम करता येते. फ्लाईंग ऑफिसर, लेफ्टनंट, स्क्वाड्रन लीडर, विंग कमांडर, ग्रुप कॅप्टन, एयर व्हॉईस मार्शल, एयर मार्शल आणि एयर चिफ मार्शल अशा अधिकार्‍यांच्या भूमिकाही पार पाडता येतात....

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh