Breaking news
05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

26-01-2018 : 10:53:45

प्रजासत्ताकदिनी भेट ! पुण्यात 150 ठिकाणी मोफत वाय-फाय

26-01-2018 : 10:53:31

"पद्मविभूषण" , ‘पद्म’ पुरस्कारांमध्ये राज्याचे ११ मानकरी

आरोग्य विज्ञान शाखेमध्ये अशी करा नावनोंदणी

Imageआरोग्य विज्ञान विद्यापीठ (नाशिक) यांच्या अधिपत्याखाली राज्यातील शासकीय, शासन अनुदानित, खासगी महाविद्यालयातील एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस सह सर्व नऊ शाखांमधील सुमारे १८ हजार जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (मुंबई) यांच्या अंतर्गत डीएमईआर - वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयातर्फे एकदाच एकत्रित पसंतीक्रम भरून प्रवेश फेऱ्यांच्या माध्यमातून राबविली जाते. सद्यःस्थितीत गोंधळून न जाता प्रवेश प्रक्रिया समजावून घ्या. ‘नीट २०१९’चा निकाल एनटीए बोर्डातर्फे संकेतस्थळावर जाहीर होईल. समान गुणांवर अनेक विद्यार्थी असल्यामुळे ‘नीट २०१९’मधील बायोलॉजी, त्यानंतर केमिस्ट्रीमधील गुण, त्यानंतर सर्व विषयांमध्ये कमीत कमी चुकीची उत्तरे नोंदविणारा व शेवटी वय (जास्त वयास प्रथम प्राधान्य) अशा क्रमाने टायब्रेकर पद्धतीने सुमारे १५ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्रपणे ऑल इंडिया रॅंक गुणपत्रिकेवर दिला जाईल.

नाव नोंदणी (रजिस्ट्रेशन) :

‘नीट’चा निकाल जाहीर झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांतच ध्र्ध्र्ध्र्.थ्र्ठ्ठण्ठ्ठड़ड्ढद्य.दृद्धढ़ या संकेतस्थळावर प्रवेश प्रक्रियेचे माहितीपत्रक, वेळापत्रक जाहीर होते. देशपातळीवरील ऑल इंडिया रॅंकचा राज्याच्या प्रवेश प्रक्रियेशी थेट संबंध नसतो. राज्यातील ८५ टक्के कोट्यातील प्रवेशासाठी पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन पद्धतीने नावनोंदणी केली जाते. नावनोंदणीसाठी सुमारे ८ ते १० दिवसांचा कालावधी दिला जातो. लक्षात ठेवा, नावनोंदणी म्हणजे संस्थांचे पसंतीक्रम भरणे नव्हे! नावनोंदणी करताना आपली वैयक्तिक, शैक्षणिक व आरक्षणाबाबतची माहिती भरावयाची असते. यामध्ये ‘नीट’मधील गुण, ऑल इंडिया रॅंक वगैरे माहिती भरून प्रवेश प्रक्रियेचे शुल्क भरावे लागते.

राज्यातून दहावी व बारावी परीक्षा उत्तीर्ण, तसेच राज्यातील डोमिसाईल असलेलेच विद्यार्थी राज्याच्या या प्रक्रियेत भाग घेऊ शकतात. विद्यार्थ्याने आपल्या आवडीनुसार कोणता कोर्स करावयाचा आहे, हे निश्‍चित केलेले असते. उदा. फक्त एमबीबीएस ध्येय आहे व ‘नीट’मध्ये अपेक्षित यशच मिळाले नाही, अशावेळी बरेच जण रिपीट पर्याय निवडतात किंवा खूपच कमी गुण म्हणजे १००पेक्षा कमी गुण मिळविणारे लाखापर्यंतचे विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत भागदेखील घेत नाहीत. २०१७ मध्ये सुमारे ५० हजार, २०१८मध्ये ६० हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेत भाग घेतला होता.

मेरिट क्रमांकाचे वाटप :

नावनोंदणी पूर्ण झाल्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट क्रमांकाचे वाटप संकेतस्थळावर जाहीर केले जाते. समजा, यंदा सुमारे ७० हजार विद्यार्थी नावनोंदणी करतील असे गृहीत धरल्यास प्रत्येक विद्यार्थ्यास एक, दोन ते ७० हजार असा राज्यस्तरीय गुणानुक्रमांक म्हणजेच स्टेट मेरिट लिस्ट दिला जाईल. राज्यामध्ये प्रवेशासाठी उर्वरित महाराष्ट्र (आरओएम - रेस्ट ऑफ महाराष्ट्र), विदर्भ व मराठवाडा असे तीन विभागीय पातळीवर ३० टक्के व ७० टक्के पद्धतीने जागांचे वाटप होते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला आरएमएल - रिजनल मेरिट लिस्ट तसेच राखीव विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवर्गातील कॅटॅगरी स्टेट मेरिट आणि कॅटॅगरी रिजनल मेरिट क्रमांकाचे वाटप केले जाते. थोडक्‍यात, नावनोंदणी हा प्रथम टप्पा अतिशय महत्त्वाचा असून, ज्याप्रमाणे नीट अथवा एमएचटीसीईटी परीक्षेचा आपण अर्ज भरला, त्याच पद्धतीने माहिती भरणे, फोटो स्वाक्षरी अपलोडिंग करणे, शुल्क भरणे व कन्फर्मेशन पेजची प्रिंट घेणे अशी पद्धत असते. प्रत्यक्षात जूनमध्ये वेळापत्रक व माहितीपत्रक प्राप्त होताच सुधारित नियमांसह योग्य वेळी माहिती दिली जाईल.विद्यार्थी,पालकांनी ध्र्ध्र्ध्र्.ड्डथ्र्ड्ढद्ध.दृद्धढ़ या संकेतस्थळाच्या संपर्कात राहावे.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh