Breaking news
07-03-2018 : 06:24:26

"फोर्ब्ज"च्या अब्जाधीशांच्या यादीत ट्रम्प 222 क्रमांकांनी गडगडले

04-03-2018 : 10:27:14

महाराष्ट्रातच राहा! मुलानेच घातली नारायण राणेंना गळ

04-03-2018 : 10:26:55

राज्यात यंदा समाधानकारक पावसाची शक्यता-हवामान खाते

04-03-2018 : 10:26:43

संत तुकाराम महाराजांचा 369वा बीज सोहळा देहुत संपन्न

16-02-2018 : 09:34:55

देशातील रबर उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर, ‘कार्बन ब्लॅक’चा तुटवडा

15-02-2018 : 10:42:52

श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ आलमला या संस्थेला कै. मातोश्री गुंडाबाई भातांब्रे स्मृती पुरस्कार मिळाला, या पुरस्काराने बसवराज धाराशिवे श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिवांना सन्मानीत करताना पंजाबचे मा. राज्यपाल श्री शिवराजजी पाटील चाकुरकर, ह.भ. प. गहिनीनाथ महाराज, मा. खा. गोपाळराव पाटील, डॉक्टर भातांब्रे, शैलेश पाटील, लोहारे गुरुजी, मोतीपवळे सर आदी.....

14-02-2018 : 10:49:33

नाशिकमधून लढण्याचा भाजपचा आग्रह राणेंना अमान्य

14-02-2018 : 10:49:01

समविचारी पक्षाबरोबरच राहण्याची राष्ट्रवादीची भूमिका- शरद पवार

10-02-2018 : 10:44:28

राज्यभरातील दस्त नोंदणी, आधार केंद्र ठप्प

10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

10-02-2018 : 10:22:37

आलमला येथील ब्ल्यु बर्ड ज्युनिअर सायन्स कॉलेजला क्रॉपसायन्सची मान्यता

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

वाहन उद्योगात करिअर

Image


करिअर म्हणून पर्याय पाहताना ऑटोमोबाईल्स इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात व्यावसायिकांसाठी निश्‍चित रूपाने दर्जेदार संधी आहेत. ऑटोमोबाईल्स इंजिनिअरिंग हे इंजिनिअरिंगच्या विविध शाखांच्या तत्त्वांचे मिश्रण आहे. जसे की मॅकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सॉफ्ट आणि कॉम्प्युटर सायन्स.

भारतीय ऑटोमोबाईल्स उद्योगात गेल्या काही वर्षांपासून वेगाने बदल झाले आहेत. भारतात स्वदेशी आणि परकीय, दोन्ही ऑटोमोबाइल्स कंपन्या आपल्या प्रक्रियाकडे आणि तंंत्रज्ञानात बदल घडवून आणण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. या माध्यमातून दर्जेदार उत्पादनाची निर्मिती करता येईल, असा कयास बांधला जात आहे. त्याचबरोबर बाजारातही भागिदारी वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. अशा स्थितीत प्रशिक्षित ऑटोमोबाईल्स इंजिनिअरिंगची मागणी वाढली आहे.

ऑटोमोबाईल्स उद्योगात ऑटोमोबाइल्सचे डिझाईन, निर्मिती, परीक्षण, देखभाल आदींचे काम तडीस नेले जाते. मोटारनिर्मिती, वाहननिर्मितीत सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे मोटारीच्या विविध भागांची रचना, जुळणी याची निश्‍चिती करणे. विविध पातळ्यांवर त्याची पडताळणी केली जाते. सुरक्षा निश्‍चित करण्यासाठी तसेच संबंधित स्थितीत सुधारणा आणण्यासाठी क्रॅश चाचणीचेदेखील आयोजन केले जाते. याशिवाय विकलेल्या वाहनांची देखभाल, दुरुस्ती करण्यासंदर्भात सेवा प्रदान करणे, बाजारातील मागणीनुसार वाहनांच्या रचनेत, आकारात बदल करणे, वाहन अद्ययावत करण्यासाठी प्रयत्नशील राहणे या बाबीचा विचार ऑटोमोबाईल्स इंजिनिअरला करावा लागतो.

श्व् रोजगाराची संधी - ऑटोमोबाईल्स उद्योगात बाईक, स्कूटर, मोटारसायक, ऑटो, मोटार, ट्रक, ट्रॅक्टर, लष्कराची वाहने आणि बस यांची निर्मिती केली जाते. या क्षेत्रात काही प्रमुख कंपन्यांची नावे घेता येईल. त्यात मारुती, टाटा मोटर्स, अशोक लेलँड, हिंदुस्थान मोटर्स, बजाज, हुंदाई, फोर्ड, फिटाट, ऑडी, मर्सिडिर्र्झ, स्कोडा, व्होक्सवॅगन, रेनॉल्ट, बीएमडब्ल्यू, टोयोटा या कंपन्यांचा समावेश आहे. ऑटोमोबाईल्स उद्योग आणि त्याचबरोबर त्याचे स्पेअरपार्ट तयार करणारे उद्योग, हे सक्षम ऑटोमोबाईल्स इंजिनिअरला विविध प्रकारचे रोजगार उपलब्ध करून देणार आहेत. डिझाईन, इंजिनिअरिंग, उत्पादन, ऑपरेशन्स, मनुष्यबळाचे व्यवस्थापन, विक्री आणि सेवा, वितरण, अर्थ, कस्टमर केअर, आयटी आणि संशोधन आणि विकास यासारख्या विविध क्षेत्रांत रोजगाराच्या संंधी उपलब्ध होताना दिसून येत आहेत. ऑटोमोबाईल्स उद्योगात रोजगाराच्या संधीची मुख्य तीन क्षेत्र आहेत, ती म्हणजे डिझाईन, डेव्हलपमेंट (विकास) आणि मॅन्युफॅक्चरिंग (निर्मिती). डिझाईनतंर्गत वाहन किंवा कंपोनेंटचा कच्चा आरखडा तयार केला जातो. डेव्हलपमेंट इंजिनिअर हा कच्च्या आराखड्याचे मूल्यांकन करतो आणि मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंगच्या सल्ल्यानुसार वाहनाची निर्मिती करतो.

ऑटोमोबाईल्स इंजिनिअरला ऑटोमाबाईल्स डिझायनर, प्रॉडक्शन इंजिनिअर, ड्रायव्हर इन्स्ट्रूमेंशन इंजिनिअर, क्वालिटी इंजिनिअर, ऑटोमेटिव्ह टेक्निशियन आणि पेंटस् स्पेशालिस्ट प्रमुख या प्रकारच्या भूमिका पार पाडाव्या लागतात. ऑटोमोबाईल उत्पादक कंपन्या आणि ऑटोमोबाईल कंपोनेंट कंपन्यांशिवाय सर्व्हिस केंद्र, परिवहन कंपनीकडून चालवण्यात येणार्‍या उद्योगातही ऑटोमोबाईल्स इंजिनिअरची गरज भासते. ऑटोमोबाईल्स सॉफ्टवेअर योजनांचे संचलन करणार्‍या कंपन्या, माहिती तंत्रज्ञान कंपन्यादेखील या व्यावसायिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे काम करत असते; मात्र यासाठी सॉफ्टवेअर अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण घ्यावे लागते. रोजगाराचे अन्य साधन म्हणजे गॅरेज सु डिग्री करणे. या क्षेत्रात संशोधन आणि अध्यापनाचे पर्याय देखील अत्यंत महत्त्वाचे पर्याय आहे. ऑटोमोबाईल्स इंजिनिअरिंगमध्ये संशोधनाची संधी देणार्‍या घटकांत एरोडायनॅमिक्स, पर्यायी इंधन चेसिस, इलेक्ट्रॉनिक, निर्मिती साहित्य, मोटर स्पोर्ट, पॉवर ट्रेन, रॅपिड प्रोटोटायपिंग, वाहन आणि पादचारी प्रवाशांची सुरक्षा किंवा सप्लाय चेन मॅनेजमेंटचा समावेश आहे. ऑटोमोबाईल्स क्षेत्रात कामकाज करण्यात युवकाला मोठा वाव आहे. यात विविध विभागांत काम करण्याबरोबरच ऑटोमोबाईल्स मॅन्युफॅक्चरच्या विविध पैलूंसंबंधी कौशल्य मिळवण्याची संधी मिळते.

श्व् वेतन - ऑटोमोबाईल्स इंजिनिअरला सुरवातीला दरमहा 10 हजारांपासून 15 हजारांपर्यंत वेतन मिळू शकते. आयआयटी, एनआयटी, बिटस्सारख्या नामांकित संस्थेतील विद्यार्थ्यांना उच्च वेतनाचे पॅकेज मिळते.

श्व् कौशल्ये - ऑटोमोबाईल्स इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमात चांगल्या प्रदर्शनासाठी गणित अणि विज्ञानाची माहिती असणे गरजेचे आहे. कौशल्य असणे ही इंजिनिअरिंग क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आवश्यक आहे. यासाठी विचार, वस्तुनिष्ठ दृष्टिकोन, श्रमाची तयारी, संशोधन यासारखे गुण असणे गरजेचे आहे. या क्षेत्रात रोजगाराची संधी शोधणार्‍यांना अशा प्रकारच्या गुणांची गरज असते. स्केचिंग आणि ड्रॉईंग कौशल्यांसह तांत्रिक प्रशिक्षणाबरोबरच उमेदवाराच्या अंंगी संघटन कौशल्य, निर्णय क्षमता, समस्येचा निपटारा करण्याची क्षमता असणे यासारखे गुण आवश्यक आहेत. या गुणांच्या आधारावर तो उद्योगाला चांगला न्याय देऊ शकतो, असे गृहित धरले जाते.

शिकण्याची तयारी, जनसंपर्काचे नेटवर्क चांगले राखण्याची जबाबदारी ऑटोमोबाईल्स इंजिनिअरवर असते. अशा प्रकारच्या नेटवर्कमधून ऑटोमोबाईल्स क्षेत्रात प्रगतीला वाव मिळतो. देशात ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा अभ्यास शिकवणार्‍या संस्थांची संख्या कमी नाही. ऑटोमोबाईल्स कंपनीत विविध पदांवर नेमण्यासाठी प्रशिक्षित इंजिनिअरची मोठी कमतरता आहे. या क्षेत्रात आवड जोपासणार्‍या आणि कामाप्रती निष्ठा राखणार्‍या उमेदवाराचे भवितव्य उज्ज्वल आहे.

श्व् शैक्षणिक पात्रता - ऑटोेमोबाईल इंजिनिअरमध्ये डिप्लोमापासून पीएचडीपर्यंत अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी इच्छुक विद्यार्थी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये करिअर बीई किंवा बीटेक अभ्यासक्रमाने सुरुवात क डिग्री शकतात. तसेच मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बीई किंवा बीटेक अभ्यासक्रम केल्यानंतर
ऑटोमोबाईल्स इंजिनिअरिंगमध्ये एमटेक क डिग्री शकतात.

ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगअंतर्गत काही विषयांत थर्मोडायनामिक्स, एरोडायनामिक्स, इलेक्ट्रिकल मोशन, कंबश्यन इंजिन, व्हेईकल चेसिस, सप्लाय चेन मॅनजेंमट, मशिन डिझायन, कॉम्प्युटर अ‍ॅडेड डिझाईन, प्रोटोटाइप क्रिएशन्स आणि एगोर्र्नॉमिक्स, फ्लुईड मेकॅनिक्स, एमिशन्स, वर्कशॉप तंत्रज्ञान याचा समावेश आहे. हे सर्व अभ्यासक्रम व्यावहारिक प्रयोग आणि प्रशिक्षण याचे मिश्रण आहे. बहुतांश विद्यार्थी अभ्यासक्रमापेक्षा इंटरशिपला अधिक महत्त्व देतात.

इंटरशिपदरम्यान विद्यार्थी प्रत्यक्ष ठिकाणी कामाचा अनुभव घेतात. या कामात मोटारीला हविस (हॉईस्ट) वर वर उचलणे, एअर फिल्टर, इंधन फिल्टर, इंजिन ऑइल, स्पार्क प्लग बदलणे, टायर पंक्चर काढण्यापासून डिझायनिंग सॉफ्टवेअरबराबेर काम करणे आणि कंपोनेंटस असेंबल करणे आदी प्रशिक्षणाचा त्यात समावेश असतो. काही विद्यार्थ्यांच्या मते, मेकॅनिकडून दिलेल्या टीप्स या एखाद्या ऑटोमोबाईल्स इंजिनिअरपेक्षा मोलाच्या असतात. कारण, मेकॅनिक हा प्रत्यक्ष कामातून मिळवलेल्या अनुभवातून टीप्स देत असतो.

इंजिनिअर मेकॅनिक्स, अप्लाईड थर्मोडायनॅमिक्स, मेकॅनिकल इंजिनिअर, रोबोटिक्स आणि ऑटोमेशन आदी विषयांत प्रमाणपत्र आणि डिप्लोमा अभ्यासक्रम विविध अभियांंत्रिकी महाविद्यालयांत, पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये उपलब्ध आहेत.

पदवी प्राप्ती करण्यासाठी इच्छुक असणारे एआयएमईची परीक्षा देऊ शकतात. ही इंजिनिअरिंगची बहिस्थ परीक्षा मानली जाते. त्याचे संयोजन इन्स्टिट्यूटशन ऑफ इंजिनिअर्स इंडियाकडून केले जाते. हा अभ्यासक्रम व्यावसायिक प्रमाणपत्र पदवीशी समकक्ष मानला जातो.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh