Breaking news
07-03-2018 : 06:24:26

"फोर्ब्ज"च्या अब्जाधीशांच्या यादीत ट्रम्प 222 क्रमांकांनी गडगडले

04-03-2018 : 10:27:14

महाराष्ट्रातच राहा! मुलानेच घातली नारायण राणेंना गळ

04-03-2018 : 10:26:55

राज्यात यंदा समाधानकारक पावसाची शक्यता-हवामान खाते

04-03-2018 : 10:26:43

संत तुकाराम महाराजांचा 369वा बीज सोहळा देहुत संपन्न

16-02-2018 : 09:34:55

देशातील रबर उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर, ‘कार्बन ब्लॅक’चा तुटवडा

15-02-2018 : 10:42:52

श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ आलमला या संस्थेला कै. मातोश्री गुंडाबाई भातांब्रे स्मृती पुरस्कार मिळाला, या पुरस्काराने बसवराज धाराशिवे श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिवांना सन्मानीत करताना पंजाबचे मा. राज्यपाल श्री शिवराजजी पाटील चाकुरकर, ह.भ. प. गहिनीनाथ महाराज, मा. खा. गोपाळराव पाटील, डॉक्टर भातांब्रे, शैलेश पाटील, लोहारे गुरुजी, मोतीपवळे सर आदी.....

14-02-2018 : 10:49:33

नाशिकमधून लढण्याचा भाजपचा आग्रह राणेंना अमान्य

14-02-2018 : 10:49:01

समविचारी पक्षाबरोबरच राहण्याची राष्ट्रवादीची भूमिका- शरद पवार

10-02-2018 : 10:44:28

राज्यभरातील दस्त नोंदणी, आधार केंद्र ठप्प

10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

10-02-2018 : 10:22:37

आलमला येथील ब्ल्यु बर्ड ज्युनिअर सायन्स कॉलेजला क्रॉपसायन्सची मान्यता

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

डॉ. जॉन कर्कलीन

Image


जगातील अगदी पहिल्‍या ‘ओपन हार्ट’ शस्‍त्रक्रिया करण्‍याचे श्रेय डॉ. जॉन कर्कलीन यांच्‍याकडे जाते. १९५० च्‍या दशकात डॉ.गिबनने विकसित केलेल्‍या ‘हार्ट-लंग मशीनमध्‍ये’ डॉ. कर्कलीन यांनी काही सुधारणा केल्‍या व त्‍या उपकरणाचा वापर शस्‍त्रक्रियेसाठी केला. आज हृदयावरील शस्‍त्रक्रियांमध्‍ये या उपकरणाचा वापर केला जाते. हार्ट-लंग मशीनचा सुकर व ‘रूटीन’ वापर होण्‍यामागचे श्रेय कर्कलीन यांचे आहे.

५ एप्रिल १९१७ रोजी अमेरिकेतील इंडियाना प्रांतात म्युनिस नावाच्‍या गावात कर्कलीन यांचा जन्‍म झाला. १९४२ मध्‍ये ‘हार्वर्ड मेडिकल स्‍कूल’ मधून त्‍यांनी वैद्यकीय पदवी प्राप्‍त केली. वैद्यकीय पदवी मिळविण्‍यापूर्वी १९३८ मध्‍ये त्‍यांनी मिनेसोटा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले होते. पेनसिल्‍व्‍हेनिया विद्यापीठाच्‍या फिलाडेल्फिया येथील रुग्‍णालयात त्‍यांनी वैद्यकीय इंटर्न म्‍हणून उमेदवारी केली. त्‍यानंतर मेयो क्लिनिकमध्‍ये त्‍यांनी सर्जरीच्‍या (शल्‍यचिकित्‍सा) अभ्‍यासाला सुरुवात केली. मिनेसोटा विद्यापीठातून त्‍यांनी शल्‍यचिकित्‍सेचे पदव्‍युत्तर शिक्षण घेतले व १९५० मध्‍ये मेयो क्लिनिकमध्‍ये काम करण्‍यास सुरुवात केली.

‘हार्ट लंग मशीन’चा वापर करण्‍यास कर्कलीन यांनी सुरुवात केली, इतकेच नव्‍हे तर हृदयशस्‍त्रक्रियांच्‍या क्षेत्रात त्‍यांनी भरीव योगदान दिले आहे. अतिदक्षता विभागात संगणकीकृत निरीक्षणे ठेवणे व तेथील रुग्‍णांच्‍या अतिमहत्त्वाच्‍या चाचण्‍यांवर सतत लक्ष ठेवणे हे आज आपल्‍या ओळखीचे आहे. परंतु अशा प्रकारचा अतिदक्षता विभागअसावा अशी कल्पना मांडून , त्‍याचे प्रारूप कर्कलीन यांनी सुचविले व आज जगभरात ते अंमलात येते आहे. या प्रारूपाच्‍या वापरामुळे रुग्‍णांची काळजी घेणे सुलभ झाले आहे. त्‍याचप्रमाणे शस्‍त्रक्रियेनंतरची गुंतागुंत कमी झाली आहे व पर्यायाने कित्‍येकांना जीवदान मिळाले आहे.

१९६६ मध्‍ये कर्कलीन यांनी अमेरिकेतील अलाबामा विद्यापीठात सर्जरी (शल्‍यचिकित्‍सा) विभागात कामाला सुरुवात केली व थोड्याच अवकाशात अमेरिकेतील उत्‍कृष्‍ट असा हृदयशल्‍यचिकित्‍सा कार्यक्रम तेथे सु डिग्री केला. कर्कलीन यांच्‍या सन्‍मानार्थ १९९२ मध्‍ये या विभागास त्‍यांचे नाव देण्‍यात आले. आज हा विभाग ‘कर्कलीन क्लिनिक’ म्‍हणून ओळखला जातो.

कर्कलीन यांनी त्‍यांच्‍या ज्ञानाचा कायमच इतरांना उपयोग करून दिला. त्‍यांचे एक महत्त्वाचे वैशिष्‍ट्य म्‍हणजे ते नेहमीच त्‍यांच्‍या विद्यार्थ्‍यांना व सहकार्‍यांना स्‍वतःजवळील माहिती व ज्ञान भरभरून देत असत. त्‍यांनी ७०० पेक्षा अधिक शोधनिबंध प्रसिद्ध केले. कित्‍येक प्रख्‍यात वैद्यकीय नियतकालिकांच्‍या संपादकीय मंडळांवर काम केले. ‘द जर्नल ऑफ थोरॅसिक अॅण्‍ड कार्डिओव्‍हॅस्‍क्‍युलर सर्जरी’ या हृदयशल्‍यचिकित्‍सेला वाहिलेल्‍या नियतकालिकाचे ते संपादक होते.

त्‍यांनी ‘कार्डिअॅक सर्जरी’ (हृदयशल्‍यचिकित्‍सा) या नावाचे एक पुस्‍तक लिहिले. ते आजही या विषयातील उत्‍कृष्‍ट संदर्भग्रंथ म्‍हणून गणले जाते.

मेयो क्लिनिक-गिबनहार्ट लंग मशीन. १९५५मध्ये डॉ. कर्कलीन व त्यांच्या सहकाऱ्यांनीया उपकरणाचा उपयोगओपन-हार्टशस्‍त्रक्रियांसाठी केला.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh