Breaking news
20-11-2017 : 10:03:05

लवकरच स्विस बँकेतील काळ्या पैश्याची माहिती मिळण्याची शक्यता

20-11-2017 : 10:02:26

पृथ्वीवर वीस वर्षांत झालेल्या बदलांच्या चित्रणात ‘नासा’ला यश

20-11-2017 : 10:02:15

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल यांना उच्चपदस्थ नोकरशहांपेक्षा कमी वेतन

18-11-2017 : 11:16:39

देशाची राजधानी नागपूरला हलवा : श्री श्री रविशंकर

18-11-2017 : 11:15:41

2 भारतीय सैनिकांवर फ्रान्समध्ये 100 वर्षांनी झाले अंत्यसंस्कार

18-11-2017 : 11:15:18

भारत-चीन सीमेवर ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप

17-11-2017 : 10:18:17

भाजपा राहुल गांधींच्या लोकप्रियतेने भयभीत, राजीव गांधींना बदनाम करण्याचे कारस्थान - शरद पवार

16-11-2017 : 05:20:36

दूरसंचार, बँकींग क्षेत्रातील ८० हजार नोक-यांवर गदा!

13-11-2017 : 10:22:54

क्तक़्क़क् बॅंकने ग्राहकांंसाठी केले ३ मोठे बदल

13-11-2017 : 10:15:33

वेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून 25 हजार रूपयांचे प्रोत्साहन

13-11-2017 : 10:14:24

इराण-इराक सीमा भागात मोठा भूकंप, १२९ नागरिकांचा मृत्यू

13-11-2017 : 10:13:19

राजस्थानातील डॉक्टरांच्या संपाला राज्यातील सरकारी डॉक्टरांचा पाठिंबा

13-11-2017 : 10:10:48

चार वर्षात डेबिट-क्रेडीट कार्ड, ॠच्र्ग् इतिहासजमा : नीती आयोग

13-11-2017 : 10:08:32

विद्यापीठ नामांतराविरोधात आज सोलापूर बंदची हाक

11-11-2017 : 10:14:42

शेतीचे शिक्षण शाळेतून देण्यात सरकार उदासीन

शैक्षणिक योजना कागदावरच

Imageप्रत्येक मुलाचा शिक्षण हा अधिकार असून प्रत्येक विद्यार्थी देशाचे भविष्य आहे. मात्र मंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाला काही घेणे-देणे नसल्याचे पालिकेच्याच आकडेवारीवरून समोर आले आहे. सन २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात शिक्षणासाठी तरतूद केलेल्या निधीपैकी ३७८.६६ कोटींचा निधी वारपाविना वाया गेला आहे. त्यात पालिका शाळांतील विद्यार्थ्यांची लागलेली गळती थांबवण्यात शिक्षण विभाग व प्रशासन अपयशी ठरत असताना यंदाच्या २०१९-२० च्या शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पात फक्त १६४ कोटींची वाढ केली आहे. सन २०१९-२० चा शिक्षण विभागाचा २,७३३.७७ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र सादर अर्थसंकल्पातील निधी विनावापर पडून राहिल्याने शिक्षणाची ऐसी की तैसी म्हणणे वावगे ठरणार नाही.

सन २०१८-१९ चा शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प २,५६९.३५ कोटींचा होता. या वर्षी म्हणजे २०१९-२० च्या अर्थसंकल्पात १६४ कोटी वाढवून २,७३३.७७ कोटींचा अर्थसंकल्प शिक्षण समितीत सादर करण्यात आला होता.

२०१९-२० च्या अर्थसंकल्पात महसुली खर्चासाठी २,४७३.१३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर भांडवल खर्चासाठी फक्त २६०.६४ कोटींची तरतूद केली आहे, तर गेल्या वर्षी महसुली खर्चात १,९५२. ५३ कोटी आला होता, तर यंदाच्या अर्थसंकल्पात हा खर्च वाढवून २,४७३.१३ कोटी केला आहे.

गेल्या वर्षी शिक्षण विभागाच्या महसुली उत्पन्नात घट झाली असून २०१८-१९ मध्ये हे उत्पन्न २,१८३.७१ कोटी होते. प्रत्यक्षात मात्र १,९५२.५३ कोटीच जमा झाले, तर भांडवली खर्च ३८५.६४ कोटी दाखवला, तर हा आकडा घसरून २३८.१६ कोटींवर आला आहे.

सात हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून त्यासाठी २४.३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. २५ माध्यमिक शाळांमध्ये ई-वाचनालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून पाचवी ते दहावीच्या सर्व शाळांमध्ये ई-वाचनालयासाठी १.३० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. १३०० डिजिटल क्लासरूम उभारण्यात येणार असून त्यासाठी ८.२४ कोटी रुपयांची तरतूद आहे. सद्यस्थितीत ६४० बालवाडी वर्ग सु डिग्री असून पुढील आर्थिक वर्षात २६० बालवाडी वर्ग सु डिग्री करण्यात येणार आहेत. बालवाडीच्या सर्व विद्यार्थ्यांना खेळणी आणि गणवेश देण्यासाठी ७.३८ कोटी तरतूद आहे. डेक्स व बेंचसाठी १० कोटींची तरतूद केली आहे. शाळा दुरुस्तीची ५९ कामे प्रगतिपथावर असून पुढील आर्थिक वर्षात २६ कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यासाठी २०१.७३ कोटी तरतूद केली आहे. व्हच्र्युअल क्लासरूमसाठी १७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शैक्षणिक सहलींसाठी ४.४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. स्वच्छ मुंबई आणि सुरक्षा अभियानासाठी ३.५७ कोटी रुपयांची तरतूद आहे.

प्रयोगशाळा
पालिका शाळातील विद्यार्थ्यांचे भाषा कौशल्य समृद्ध करण्यासाठी भाषा प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. यामधील विध्यमं संगणक प्रयोगशाळा व साधनसामग्रीचा ५वी ते ८वी च्या विद्यार्थाना याचा लाभ होणार आहे. यंदा बजेटमध्ये ९.३० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

टिंकर लॅब
पालिकेतील ५वी ते ८वीचा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या २०८ संगणक प्रयोगशाळांचा वापर करून टिंकर लॅब सु डिग्री करण्याचा विचार शिक्षण खात्याने केला आहे. यामुळे विद्यार्थाना नियमित शिक्षणाबरोबर अतिरिक्त शिक्षणाची जोड मिळणार आहे. या टिंकर लॅबमध्ये एखादी वस्तू किंवा प्रतिमेचा विचार करून तिला हवा तास आकार, रूप देवी त्यांची त्रिमिती प्रतिकृती बनविण्यात येणार आहे. यामध्ये स्क्रॅच प्रोग्रॅमिंग, आर्डिनो प्रोग्रॅमिंगच्या वापरासह थ्रीडी डिझायनिंग आणि प्रिंटिंग इलेट्रॉनिक रोबोट बनविणे, मोबाईल अ‍ॅप विकसित करणे इत्यादी सुविधा उपलब्ध घेतील. या टिंकर लॅबसाठी बजेटमध्ये १.४२ कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे.

पालिका शाळांचे मूल्यमापन
नाबेट या संस्थेद्वारे पालिका शाळांचा दर्जा व गुणवत्ता यांचे मूल्यमापन करण्यात येणार असून त्यांच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी पालिका शाळांमधून केली जाणार आहे. या उपक्रमासाठी बजेटमध्ये २० लाखांची तरतूद केली गेली आहे.

विज्ञान कुतूहल भवन
विज्ञान कुतूहल भवन हा खगोल, भूगोल व आरोग्य या विषयांवरील चलत प्रतिकृतींचा शिक्षण विभागाचा केंद्रीय स्वरूपाचा स्वातंत्र प्रकल्प असून येथे चलत प्रतिकृतींचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी सर्व भाषिक शाळांचे विद्यार्थी येतात. याच गोष्टीचा विचार करून ज्या शाळा इमारतीत मोठय़ा सभागृहासाठी जागा उपलब्ध आहे, अशा जागेत विज्ञान कुतूहल भवन उभारण्यात येणार आहे. याकरिता बजेटमध्ये १.२० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

‘नव्या घोषणां फक्त कागदावर
काळानुरूप बदलणा-या शिक्षण पद्धतीत बदल होत असताना मुंबई पालिकेद्वारे सादर करण्यात आलेला शिक्षणाचा अर्थसंकल्प निराशाजनक ठरला आहे. २०१९-२० या शैक्षणिक अर्थसंकल्पात जुन्या तरतुदींना नव्या घोषणांचे लेबल चिकटवण्यात आले आहे.

भाषा प्रयोगशाळा, ई-लायब्ररी, डिजिटल वर्ग, जिम, सीसीटीव्ही, क्रीडा अकादमी, संगीत अकादमी, शाळांचे मूल्यमापन, खेळांची साधने अशा जुन्याच तरतुदी आहेत. अगदी मोजक्या नवीन तरतुदी करण्यात आल्या असून यामध्ये शाळांसाठी महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शैक्षणिक मंडळाच्या संलग्नतेसाठी पालिकेच्या शाळांची नोंदणी झाली असून शासनाकडून शाळांची निवड करण्याची प्रक्रिया सु डिग्री आहे. ५वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध २०८ संगणक प्रयोगशाळांचा वापर करून टिंकर लॅब सु डिग्री करण्याचा विचार आहे.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh