Breaking news
10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

अन् प्रशासनाची लगबग सुरू…

Image

….

मा.भारत निवडणूक आयोगाने दि.21 सप्टेंबर 2019 रोजी आपल्या महाराष्ट्र राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 चा कार्यक्रम घोषित केला अन् सबंध महाराष्ट्रातील प्रशासनाची धावपळ सु डिग्री झाली. बैठकांवर बैठका सु डिग्री आहेत, अधिकारी-कर्मचाऱ्यांवर निवडणुकीच्या कामाशी संबंधित विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात येत आहेत,भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयातून सर्व जिल्ह्यांना मार्गदर्शक सूचना, आदेश या विषयांच्या पत्रव्यवहाराचा ओघ सु डिग्री झाला आहे, जनतेलाही सबंध जिल्ह्यात प्रशासनाकडून चाललेली कामाची धावपळ जाणवू लागली. हे पाहून अनेकांना प्रश्न पडला की, निवडणुका जाहीर होताच प्रशासनाकडून इतक्या तातडीने कार्यवाही सु डिग्री होते, ती नेमकी कशाबद्दल? जनतेला पडलेल्या या प्रश्नांची उत्तरे या विशेष लेखातून देण्याचा हा छोटासा प्रयत्न…

विधानसभा सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्याबरोबर करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर सूचना भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय यांच्याकडून निर्गमित करण्यात आल्या.

काय आहेत त्या सूचना? चला तर पाहूया…

1) संपत्तीचे विद्रुपीकरण:-

अ) शासकीय संपत्तीचे विद्रुपीकरण:- यामध्ये सर्व शासकीय कार्यालयांची आणि कॅम्पस मधील सर्व कार्यालयीन इमारती यांचा समावेश होतो. शासकीय संपत्तीच्या भिंतीवरील लेखन, पोस्टर्स, पेपर्स किंवा कट आउट, होर्डींग्स, बॅनर्स, झेंडे इत्यादी निवडणुका जाहीर झाल्यानंतर 24 तासांमध्ये काढून टाकण्यात यावेत.

आ) शासकीय संपत्तीचे विद्रुपीकरण व सार्वजनिक जागेचा गैरवापर:- यामध्ये सार्वजनिक संपत्तीच्या भिंतीवरील लेखन, पोस्टर्स, पेपर्स किंवा कट आउट, होर्डिंग्ज, बॅनर्स, झेंडे इत्यादी आणि सार्वजनिक ठिकाणी जसे की रेल्वे स्टेशन, बस स्टँड, विमानतळ, रेल्वे, पूल, रस्ते, शासकीय बसेस, इलेक्ट्रिक/टेलिफोन खांब, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इमारती येथील अनधिकृत राजकीय जाहिराती निवडणुका जाहीर झाल्यापासून 48 तासात काढून टाकण्यात याव्यात.

इ) खाजगी संपत्तीचे विद्रुपीकरण:- खाजगी संपत्तीवरील सर्व अनाधिकृत राजकीय जाहिराती निवडणुका जाहीर झाल्यापासून 72 तासांमध्ये काढून टाकण्यात याव्यात.

2) शासकीय वाहनाचा दुरुपयोग:-

निवडणूक जाहीर झाल्यापासून 24 तासांमध्ये राजकीय पक्ष, उमेदवार किंवा अन्य निवडणुकांचा प्रचार-प्रसार अथवा निवडणुकीसंबंधी कामकाजासाठी शासकीय वाहनाचा उपयोग करण्यासाठी संपूर्ण बंदी करण्यात यावी.

3) सार्वजनिक निधीच्या खर्चावर जाहिरात:-

निवडणूक जाहीर झाल्यानंतर सार्वजनिक निधीच्या खर्चावर जाहिरात करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या जाहिराती तात्काळ बंद करण्यात याव्यात.

4) शासकीय संकेतस्थळावरील राजकीय कार्यकर्त्यांचे फोटो:-

निवडणुका जाहीर होताच शासकीय संकेतस्थळावरून राजकीय कार्यकर्त्यांचे फोटो तात्काळ काढून टाकण्यात

यावेत. विकास, बांधकाम क्षेत्रातील गतीविधी निवडणूक जाहीर झाल्यापासून 72 तासांमध्ये आचारसंहितेचे

उल्लंघन या संदर्भातील तक्रारीच्या अनुषंगाने कोणत्याही तक्रारी मान्य करण्यासाठी 1)प्रत्यक्ष कामाची सुरुवात

झालेल्या कामांची यादी 2) प्रत्यक्ष कामाची सुरुवात न झालेल्या कामांची यादी अशा स्वतंत्र यादया प्राप्त करून

घेण्यात याव्यात.

5) निवडणूक खर्च देखरेख आणि आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी याबाबतची कार्यवाही:-

फ्लाईंग स्क्वॉड, क़च्च्र्,ज्च्च्र्,च्च्च्र् टीम,व्हीडिओ टीम, दारू, रोकड प्रतिबंधित औषधे यांची सखोल तपासणी, राज्य

उत्पादन शुल्क विभागांतर्गत अवैध औषधे, नशिले पदार्थांच्या वाहतुकीसंदर्भात फ्लाईंग स्कॉड व इतर आवश्यक

टीम तातडीने कार्यान्वित करण्यात याव्यात.

6) तक्रार देखरेख यंत्रणा:-

निवडणुका जाहीर झाल्यापासून 24 तासांच्या आतमध्ये तक्रार यंत्रणा कार्यान्वित करण्यात याव्यात.

7) क्ष्च्र् ॲप्लिकेशन्स :-

निवडणुका जाहीर होताक्षणी अधिकृत संकेतस्थळ यांसह क्ष्च्र् ॲप्लिकेशन्स आणि सोशल मीडिया तात्काळ

कार्यान्वित करण्यात यावेत.

8) मतदार व राजकीय पक्षांच्या जागृतीसाठी माहितीचे प्रसारण करणे:

निवडणूकविषयक प्रमुख घडामोडींची जाहिरात करण्यात यावी. रेडिओ,दूरचित्रवाणी, सिनेमागृह, शासकीय वाहिन्या यांच्यावरून मतदार जागृती किंवा शिक्षण सामग्रीचे प्रसारण करण्यात यावे.

9) शैक्षणिक व खाजगी संस्थांकडून सक्रीय सहकार्य:-

निवडणूक विषयक माहिती सर्वसामान्य नागरिक व सर्व संबंधितांपर्यंत पोहोचविण्यासाठी शैक्षणिक व खाजगी

संस्थांकडून सक्रीय सहकार्य घेण्यात यावे.

10)माध्‍यम केंद्र:-

मतदार,राजकीय जाहिरातीच्या प्रसारणपूर्व प्रमाणीकरण करण्यासाठी राजकीय पक्ष व सर्व संबंधितांमध्ये ईव्हीएम/

व्हीव्हीपॅट सह निवडणूक यंत्रणेबाबत जागृती निर्माण करण्यासाठी माध्यम केंद्राचा उपयोग करण्यात यावा.

11)ग्क्ग्क्/क़्कग्क्:-

राजकीय जाहिरातीच्या प्रसारण पूर्व प्रमाणीकरण करण्यासाठी राजकीय पक्ष माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण

समितीकडे निवडणूकनिर्णय अधिकाऱ्यामार्फत अर्ज सादर करतील. त्यानुषंगाने आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर

पालन करण्यात यावे.

12)नियंत्रण कक्ष:-

जिल्हास्तरावर 24ज्र्7 कक्ष तात्काळ स्थापन करण्यात यावा व त्यासाठी पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ आणि अन्य साहित्य

उपलब्ध करून देण्यात यावे.

अशा प्रकारे निवडणुका जाहीर झाल्याबरोबर शासकीय स्तरावर विविध प्रकारच्या कार्यवाही/कामे तात्काळ सु डिग्री करण्यात येतात.मनोज शिवाजी सानप

जिल्हा माहिती अधिकारी,

लातूर

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh