Breaking news
10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

गरज मूल्यशिक्षणाची

Imageआजच्या गतिमान युगात व धावपळीच्या जीवनशैलीत मानवी जीवन गुरफटलेले आहे. अध्ययन करणारा विद्यार्थीसुद्धा त्याला अपवाद नाही. मोठय़ांच्या यांत्रिक व्यवहाराबरोबरच शालेय विद्यार्थ्यांचे जीवन यांत्रिक स्वरूपाचे झालेले आहे. विद्यार्थी जीवनातील वय संवेदनशील असते. आज अवघ्या विश्वाची झपाटय़ाने प्रगती होत असताना आधुनिकीकरणामुळे मानवी जीवनाची संस्कृती पूर्णपणे बदललेली आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरातील वडीलधारी माणसे व लहान मुले यांच्यामध्ये फारसा संपर्क उरलेला नाही. कुटुंबातील पती-पत्नी नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडत आहेत. या सर्व वातावरणाचा परिणाम मुलांवर होत आहे.

मानवाला अशक्य असे काहीही नाही, एवढी कामगिरी आधुनिक तंत्रज्ञानाने करून दाखवली आहे; परंतु तरीही मानव असुरक्षित आहे, कारण कमावलेल्या शक्ती -सामर्थ्यांबरोबर त्याच्याशी सुसंगत अशी मानवता, संस्कार जपणारी योग्य मूल्ये जोपासली गेलेली नाहीत. कारण, ढासळलेली मूल्ये त्या प्रगतीला गालबोट लावतात. म्हणूनच आज घराघरांतून मूल्यशिक्षण देण्याची गरज आहे.

‘. आजूबाजूला घडणा-या या घटना अल्पवयीन मुलांवर परिणाम घडवून आणतात. त्यांच्या वर्तणुकीतून ते दिसून येते. गुंडागर्दी करणे, बळाचा वापर करणे, अपशब्द वापरणे, यांत मुलांना काही चुकीचे वाटत नाही, कारण सभोवताली तेच त्यांना दिसून येते. आज माणूस मूल्यांपासून दूर जाताना दिसत आहे. म्हणून म्हणावेसे वाटते, ‘अरे माणसा माणसा, कधी होशील तू माणूस’.


आजच्या आधुनिक युगात मानवाच्या गरजा वाढत आहेत. त्या गरजा पुरविण्यासाठी त्याची चालू असलेली धडपड आणि या धडपडीच्या प्रवाहात तो सापडत असल्यामुळे आवश्यक तेवढा वेळ मुलांना देता येत नाही. मुलांच्या जीवनाकडे, जडणघडणीकडे पाहणे त्यांना अशक्य होत आहे. मानवाला अशक्य असे काहीही नाही, एवढी कामगिरी आधुनिक तंत्रज्ञानाने करून दाखवली आहे; परंतु तरीही मानव असुरक्षित आहे, कारण कमावलेल्या शक्ती-सामर्थ्यांबरोबर त्याच्याशी सुसंगत अशी मानवता, संस्कार जपणारी योग्य मूल्ये जोपासली गेलेली नाहीत. त्याची आज गरज आहे. नुसती प्रगती महत्त्वाची नाही, तर तिला मूल्यांची जोड असणेदेखील अत्यावश्यक आहे, कारण ढासळलेली मूल्ये त्या प्रगतीला गालबोट लावतात. म्हणूनच आज घराघरांतून मूल्यशिक्षण देण्याची गरज आहे.

मूल्य म्हणजे मानवाच्या सदाचारपूर्ण वर्तणुकीची तत्त्वे होत व मूल्यशिक्षण म्हणजे, संस्कार संक्रमणाचे कार्य होय. आजची मुले उद्याचे भावी नागरिक आहेत. भावी नागरिक सुजाण व संस्कारक्षम असला पाहिजे, यासाठी शाळेतून मूल्यशिक्षण रुजवायला हवे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, साने गुरुजी अशा थोर व्यक्ती मूल्यशिक्षणातूनच घडलेल्या आहेत. त्यांच्या विचारांची कास धरूनच आपल्याला भावी नागरिक घडवायचे आहेत.

शिक्षकाने मूल्यशिक्षणाची गरज ओळखून आपल्या विद्यार्थ्यांचा मित्र, मार्गदर्शक, प्रेरक बनावे. शिक्षकाने मूल्यांचे झाड होऊन आधी स्वत:ला रुजवायचे, नंतर विद्यार्थ्यांत त्याची बिजे पेरायची, तरच ख-या अर्थाने मूल्यशिक्षण जोपासले जाईल.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh