Breaking news
05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

26-01-2018 : 10:53:45

प्रजासत्ताकदिनी भेट ! पुण्यात 150 ठिकाणी मोफत वाय-फाय

26-01-2018 : 10:53:31

"पद्मविभूषण" , ‘पद्म’ पुरस्कारांमध्ये राज्याचे ११ मानकरी

आनंददायी शिक्षण

Imageशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये युक्तिवाद करण्याचे, पृथक्करण करण्याचे आणि समंजसपणाचे कौशल्य वाढावे, अशी अपेक्षा असते. ती क्षमता आजच्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांना मिळणाऱ्या शिक्षणामुळे येते आहे का? की आपण त्यांना मिळणाऱ्या गुणांचाच विचार करणार आहोत? आज मिळणारे शिक्षण कितपत गुणवत्तापूर्ण आहे? आपल्याला परीक्षेत काय विचारले जाणार आहे, हे विद्यार्थी अगोदरच जाणून घेऊन परीक्षेत अतुलनीय यश मिळवितात का? विज्ञानाचे विषय सोडा, पण भाषेच्या विषयातही विद्यार्थी ९० पेक्षा अधिक गुण मिळवू लागले आहेत. तेव्हा परीक्षेचे जे मॉडरेशन केले जाते, त्याची फेरतपासणी होणे गरजेचे झाले आहे.
२०१६ सालापासून एक नवीन ट्रेन्ड पाहावयास मिळू लागला आहे. सीबीएसई बारावीच्या परीक्षेत मुले आणि मुली यांच्यातील उत्तीर्ण होण्यात दहा टक्क्यांचा फरक दिसू लागला आहे. २०१६ साली मुली ८८ टक्के तर मुले ७८ टक्के, २०१७ साली मुली ९५ टक्के तर मुले ८९ टक्के, २०१८ साली मुली ८८ टक्के तर मुले ७९ टक्के असे प्रमाण दिसून आले. मुलांपेक्षा मुली अधिक चमकताना दिसतात. कारण त्यांची अभ्यासाप्रति बांधिलकी अधिक असते. याचा अर्थ, शाळांमध्ये मुलींचे प्रवेश अधिक प्रमाणात होतात, असा काढायचा का? की नापास होणाऱ्यांत मुलांचे प्रमाण अधिक असते? तसे असेल, तर त्याची कारणे शोधायला हवीत. दहावी परीक्षेतही हाच ट्रेन्ड पाहावयास मिळतो.
संपूर्ण देशातील १६ लाख शाळांपैकी मोजक्या चांगल्या शाळा वगळल्या, तर अन्य शाळांत विद्यार्थ्यांची खोगीरभरती सु डिग्री असते. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे व्यक्तिगत लक्ष दिले जात नाही. कुठे कुठे तर अजिबात लक्षच दिले जात नाही. विद्यार्थी-शिक्षक यांच्यातील प्रमाणाला धरबंधच नसल्यामुळे विद्यार्थी कोचिंग क्लासच्या मागे धावत असतात. त्यामुळे अनुभवी शिक्षक नोकऱ्या सोडून कोचिंग क्लास चालविण्याकडेच लक्ष पुरविताना दिसतात. मानव संसाधन मंत्रालयाने लोकसभेत जी माहिती पुरविली, ती पाहता शासनातर्फे चालविल्या जाणाऱ्या संपूर्ण देशातील प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या १८ टक्के जागा रिक्त आहेत, तर माध्यमिक शाळांमधील १५ टक्के जागा रिक्त आहेत, असे दिसून येते. मुलांचे पालक नोकरीवर जात असल्याने गृहपाठाकडे लक्ष देण्यास कुणाला वेळ नसतो. कोचिंग क्लासेसने ही त्रुटी भरून काढली आहे. त्यामुळे कोचिंग क्लासेसची बाजारपेठ दरवर्षी वेगाने वाढते आहे. २०२० सालापर्यंत तिची उलाढाल ३० बिलियन डॉलर्सची मर्यादा ओलांडेल, असा अंदाज आहे.

नॅशनल सॅम्पल सर्व्हेच्या सर्वेक्षणानुसार प्रत्येक चार विद्यार्थ्यांतील एक विद्यार्थी हा कोचिंग क्लासला जात असतो, असे दिसून आले आहे. कोचिंग क्लासेसची वेगवेगळी रूपे पाहावयास मिळतात. क्लासरूम कोचिंग, स्टडी सर्कल, घरची शिकवणी आणि ऑनलाइन शिकवणी त्यात ९६ टक्के शिकवणी ही समोरासमोर करण्यात येते. ऑनलाइन कोचिंग आणि क्लासरूम कोचिंगची बाजारपेठ रु. ३,५०० कोटींची आहे. आता ग्रामीण भागातही इंटरनेटने प्रवेश केला असल्याने ऑनलाइन शिकवणीचे प्रमाण वाढते आहे. या नव्या बाजारपेठेत भांडवलदारांनीही रुची घ्यायला सुरुवात केली आहे.

सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात आपण शिक्षणाच्या गुणवत्तेची आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याची कितपत काळजी करायला हवी? शिक्षण घेण्यातला आनंद मुले केव्हाच गमावून बसली आहेत. खरी चिंता काहीच कामगिरी दाखवू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि शालेय स्तरावर अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची वाटू लागली आहे. मुले १०० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होऊ लागल्याने महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे कटऑफ गुणही वाढले आहेत. त्यामुळे चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळणे दुरापास्त झाले आहे. तेव्हा शिक्षणातून हरवलेला आनंद पुन्हा कसा मिळवून देता येईल, याचा विचार व्हायला हवा. शिक्षण ही अशी संपत्ती आहे, जिचा उपयोग जगात कुठेही होऊ शकतो, ही चिनी म्हण लक्षात घेऊन, त्यानुसार सुरुवात करण्याची खरी गरज आहे.
डॉ. एस. एस. मंठा

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh