Breaking news
10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

शिक्षणाचे महत्त्व

Imageसमाज घडविणा-या चांगल्या गोष्टी व त्यातील कमतरतेमुळे कोणकोणते धोके निर्माण होऊ शकतात, याची शिक्षणामुळे आपणा सर्वाना जाणीव होते. त्यामुळे दिवसेंदिवस समाजात शिक्षणाचे महत्त्व वाढत आहे. सुशिक्षित समाज हा उच्च आत्मसन्मान असलेल्या उत्तम सुविधांच्या व उत्तम पर्यावरणामध्ये प्रवेश करणा-या लोकांचा समूह आहे.

देशात १७व्या लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडले. अजून तीन टप्प्यातील मतदान शिल्लक असून देशात आतापर्यंत एकाही मतदान केंद्रांमध्ये शंभर टक्के मतदान झालेले नाही. उलट सहा मतदान केंद्रांत शून्य टक्के मतदान झाले. आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत ८० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान कोणत्याही राज्यात झालेले दिसत नाही. यासाठी व्यक्ती सुशिक्षित असून चालत नाही तर समाज सुशिक्षित असावा लागतो.

देशाच्या विकासासाठी चांगल्या राजकीय पक्षाची गरज असते. यासाठी साक्षर समाजाची नितांत आवश्यकता आहे. कारण सुशिक्षित समाजाला आपला राजकीय प्रतिनिधी ज्ञानी व नि:पक्ष निर्णय घेण्याची अधिक शक्यता असते. खोटी आश्वासने व अवास्तव उद्दिष्टांपासून दूर असतात. कारण बनवाबनवी कशी चालली आहे हे सुशिक्षितांच्या लगेच लक्षात येते. जेव्हा सुशिक्षित मतदाता आपले राजकीय प्रतिनिधी निवडतात तेव्हा तो विकासात्मक निर्णय घेण्याची शक्यता असते. निरक्षर मतदाता समाजाच्या विकासासाठी मते देत नाहीत. उलट त्या बदल्यात त्यांना मिळालेल्या अल्प फायद्यासाठी मतदान करीत असतात.

समाज घडविणा-या चांगल्या गोष्टी व त्यातील कमतरतेमुळे कोणकोणते धोके निर्माण होऊ शकतात, याची शिक्षणामुळे आपणा सर्वाना जाणीव होते. त्यामुळे दिवसेंदिवस समाजात शिक्षणाचे महत्त्व वाढत आहे. सुशिक्षित समाज हा उच्च आत्मसन्मान असलेल्या उत्तम सुविधांच्या व उत्तम पर्यावरणामध्ये प्रवेश करणा-या लोकांचा समूह आहे. अशिक्षित समाजातील लोक आत्मसन्मानाचा आनंद घेऊ शकत नाही. कारण ते असुरक्षिततेच्या भावनेने ग्रस्त असतात. अशिक्षित समाज एका शिक्षित समाजाची खात्री करून घेतो की, सध्या तरुण पिढीसुद्धा सुशिक्षित आहे. जेव्हा अशिक्षित समाजात अशिक्षित पिढय़ा जन्माला येतात ते आयुष्यामध्ये मानवाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी संघर्ष करताना दिसतात. त्यामुळे अशिक्षित पालक मुलांच्या शिक्षणास प्रोत्साहन देण्याची शक्यता कमी असते. साक्षर समाज आपल्या मुलांनीसुद्धा शिक्षित असल्याचे सुनिश्चित केले आहे. त्यासाठी आवश्यक आधारभूत संरचना प्रदान करीत असतात. सुशिक्षित समाजातील लोक शिक्षित असल्यामुळे विकासाकडे वळत आहेत. त्यांना आर्थिक, सामाजिक व पायाभूत सुविधा पुरविल्या जातात. कारण त्यांचे लोक सुशिक्षित आहेत. त्यांचा दृष्टिकोन हा वैज्ञानिक आहे. ते आपले उत्पन्न वाढण्याचा सतत प्रयत्न करीत असतात. त्यामुळे ते चांगले जीवनमान जगू शकतात. त्यांचा उच्च पातळीवरचा दृष्टिकोन असल्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावते.

अशिक्षित समाज हा अविकसित आहे. त्यांचे उत्पन्न अत्यंत कमी असल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असते. तेव्हा ते मूलभूत सुविधा पूर्ण क डिग्री शकत नाहीत. अशिक्षित कारणामुळे त्यांच्या कमी उत्पादनक्षमतेमुळे कमी उत्पन्न आहे. म्हणून समाजाच्या विकासाची एकमेव आशा ही त्या लोकांच्या शिक्षणावर अवलंबून आहे.

सुशिक्षित समाजामुळे कायदा व सुव्यवस्था उत्तम असल्याने संघटितपणे सभासदांच्या गरजा भागवू शकतात. त्यामुळे आनंदी व समाधानी समाज बनतो. सुशिक्षित समाजाचा अर्थ असा म्हणता येईल की त्याचे सभासद उत्तमपणे नोकरी करतात आणि स्वत: आपल्या कुटुंबीयांच्या गरजा पूर्ण करतात. त्याला आपल्या गरजा भागविण्यासाठी कायदे तोडण्याची गरज नाही. अशिक्षित समाजामुळे समाजात असंतोष निर्माण होतो. तेव्हा त्याला नाश करण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नसतो. स्वत:च्या व दैनंदिन गरजा भागविण्यासाठी गुन्हेगारी किंवा चोरी करण्याकडे वळतात. अखेर कायदा व सुव्यवस्था स्थिती निर्माण होते. म्हणजे अशिक्षित व्यक्ती गुन्हेगार अथवा चोर आहेत.

शिक्षित समाज हा श्रीमंत समाज आहे. तो नोकरी करीत असल्यामुळे त्याची संपत्ती समाधानकारक असल्यामुळे आपल्या कुटुंबीयांच्या सामाजिक व आर्थिक गरजा पुरवितो. त्यांना आपली जाणीव निर्माण झाल्याने शिक्षित समाज एकत्रित राहू शकतात. त्याच्याजवळ विकासाच्या भरपूर संधी उपलब्ध असतात. अशिक्षित समाज हा एक वंचित समाज आहे. त्याला टीचभर पोटासाठी संघर्ष करावा लागतो. ते कोणत्याही प्रकारचा बदल क डिग्री शकत नाही. याचा परिणाम मुले कुपोषित होण्याचे प्रमाण जास्त आहे. सुशिक्षित समाज हा लिंगामधील भेदभाव करीत नाहीत. सर्वाना समान संधी देतो. महिला वर्ग नोकरी करतात. त्यामुळे त्यांची आर्थिक व सामाजिक परिस्थिती सुधारते. अशिक्षित समाजात अशा बाबींची कमतरता असते. लैंगिक समानतेच्या फायद्यांपासून महिलांना पूर्णपणे दूर ठेवतात. त्यांचे काम चूल व मूल असे मर्यादित ठेवले जाते. याचा परिणाम त्यांचा आर्थिक व सामाजिक विकास खुंटतो.

आरोग्य व स्वच्छतेबाबतीत निरक्षर समाजाच्या तुलनेने साक्षर समाजाची परिस्थिती चांगली आहे. आयुष्यात अशा धोक्यांबद्दल कसे सामोरे जावे हे साक्षर समाजाला माहीत असते. त्यांना जगातील वैद्यकीय प्रगतीविषयी ज्ञान आहे. त्याचा पुरेपूर तो फायदा करून घेतो, तर अशिक्षित समाजात आरोग्याचे धोके जाणून घेण्याची दृष्टी नसते. याचा परिणाम त्यांना चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळत नाही. यासाठी व्यक्तीपेक्षा समाजामध्ये शिक्षण महत्त्वाचे आहे.


Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh