Breaking news
05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

26-01-2018 : 10:53:45

प्रजासत्ताकदिनी भेट ! पुण्यात 150 ठिकाणी मोफत वाय-फाय

26-01-2018 : 10:53:31

"पद्मविभूषण" , ‘पद्म’ पुरस्कारांमध्ये राज्याचे ११ मानकरी

जागतिक जलदिनाच्या वेगवेगळ्या थीम्स

Image


जगात जागतिक जलदिन साजरा करण्यासाठी 1993 पासून सुरवात झाली. हा दिन साजरा करण्याचे सारे श्रेय माननीय डॉ. माधवराव चितळे यांचेकडे जाते. त्यांनी रेटा लावून हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी जगाला प्रवृत्त केले आणि 1993 पासून हा दिन साजरा करावयास सुरवात झाली. याच वर्षी डॉ. चितळे यांना स्टॉकहोम जल पुरस्कार मिळाला हा काही निव्वळ योगायोग नव्हे.

या जागतिक जल दिनानिमित्त युनेस्को जगाला एक थीम देते व त्या थीमला अनुसरुन वर्षभर विविध कार्यक्रम घेतले जावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. या थीमचा उद्देश जगाचे लक्ष पाणी प्रश्नाच्या विविध पैलूंकडे समाजाचे लक्ष जावे हा असतो. ही थीम प्रत्येक वर्षाच्या सुरवातीलाच घोषित केली जाते. आतापावेतो ज्या विविध थीम्स घेण्यात आल्यात त्या वाचकांना कळाव्यात हा या लेखाचा उद्देश आहे. मग चला तर आपण या थीम्स कोणत्या याचा विचार करु या.

: पाण्याची काळजी घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे :
या वर्षाच्या आधीच्या वर्षी जगामध्ये रियो-डी-जानेरो येथे जी जागतिक परिषद झाली त्या परिषदेत पाणी ही आर्थिक वस्तु आहे अशी घोषणा करण्यात आली. आणि अशा दुर्मिळ संसाधनाची प्रत्येकाने काळजी घ्यावी ही अपेक्षैा करणे योग्यच ङोते. देशाच्या सरकारने, अथवा पाणी पुरवठा करणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांनीपाण्याची निगा राखावी, आपला त्याचेशी काही संबंध नाही अशी भूमिका जनसामान्यांनी घेवू नये तर पाण्याची काळजी घेणे, त्याची निगा राखणे, त्याला सुरक्षित ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे हे जनमानसावर बिंबवण्याचा प्रयत्न या थीमद्वारे करण्यात आला.

1995 ची थीम: महिला आणि पाणी :
निव्वळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात जल व्यवस्थापनाच्या कामात महिलाच गुंतलेल्या असतात. पण जेव्हां पाण्याबद्दल निर्णय घेण्याचा प्रश्न येतो त्यात महिलांना काहीच स्थान नसते. या बद्दल सुद्धा 1992 च्या सभेत सविस्तर चर्चा झाली आणि या व्यवस्थापनात महिलांचा वाढता सहभाग असावा यावर जोर देण्यात आला. घरातले जल व्यवस्थापन, शेतीतील जलव्यवस्थापन महिलाच करीत असतात. आळसात वेळ घालविणारा पुरुषवर्ग एकदाही पाणी भरण्यात मदत करतांना आढळत नाही. पण निर्णय मात्र सर्व पुरुषांच्या हातात कसे हे एक न उलगडणारे कोडे आहे. सिंचन खात्यात किती महिला काम करतात याचा विचार केल्यास दोनही हातांना असलेली बोटे सुद्धा त्यांची संख्या मोजण्यासाठी पुरी पडतील. त्यामुळेे जल क्षेत्रातील सर्व निर्णय महिलांचे हाती सोपवावेत या विचाराला चालना देण्यासाठी ही थीम देण्यात आली.

पाणी आणि तहानलेली शहरे :
दिवसेंदिवस शहरीकरणाची क्रिया वेग घेत आहे. आहेत ती शहरे मोठी होत आहेत, नवीन शहरे उदयास येत आहेत. ग्रामीण भागातून लोकांचे लोंढे शहराकडे येत आहेत. त्यामुळे शहरातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस बिकट बनत चालला आहे. मुंबई सारख्या शहरात तर 100-125 किलोमिटर पासून पाणी आणून लोकांची तृष्णा भागविली जात आहे. पाण्याचा व स्वच्छता यांचा फारच जवळचा संबंध आहे व पाण्याच्या अपुऱ्या उपलब्धतेमुळे शहरे वेगाने बकाल व भकास होत चालली आहेत. शहरांना पाणी पुरवठा करण्यासाठी जलसाठे शोधणे, तिथून पाणी आणण्याची व्यवस्था करणे, त्या पाण्याला पिण्यायोग्य करणे, शहरात त्यासाठी योग्य वितरण व्यवस्था उभारणे हे बिकट काम स्थानिक स्वराज्या संस्थांकडे असल्यामुळे आज या संस्था आर्थिक संकटात सापडल्या आहेत. शहरात दरडोई पाण्याची गरजही ग्रामीण भागापेक्षा जास्त असते. त्यामुळे या तहानलेल्या शहरांचा पाणी प्रश्न जगामध्ये अग्रक्रमाचा बनलेला आहे. त्याकडे लक्ष वेधण्याच्या दृष्टीने ही थीम अत्यंत योग्य वाटते.

1997 ची थीम: जगातील पाणी पुरेसे आहे काय?
जगातील उपलब्ध असलेले पाणी पाण्याची मागणी लक्षात घेता पुरे पडू शकते काय याचा विचार करण्याची वेळ समाजावर आली आहे हे या थीमद्वारे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पाण्याचा पुरवठा वाढविणे तर आपल्या हातात नाही कारण तो निसर्गाच्या हातात आहे. मग मागणी व पुरवठा यांचेमध्ये संतुलन आणावयाचे असेल तर मागणीबद्दलच विचार करावा लागणार आहे. पाण्याचे जे विविध उपयोग होत आहेत त्या प्रत्येक उपयोगात आपण पाण्याची बचत करु शकतो काय हा खरा प्रश्न आहे. थोडक्यात कायतर पाण्याची बचत करण्यास प्रोत्साहन देणारी अशी ही थीम आहे.1999 ची थीम: प्रत्येक जण हा प्रवाहाच्या खालच्या बाजूला असतो:
प्रवाहाच्या वरच्या बाजूचा आणि खालच्या बाजूचा अशा दोन संज्ञा प्रचलित आहेत. पण या दोनही संज्ञा सापेक्ष आहेत. प्रवाहाची खालची बाजू प्रवाह पुढे गेल्यावर प्रवाहाची वरची बाजू बनते. प्रत्येक गावातील सांडपाणी जेव्हा प्रवाहात सोडले जाते त्यावेळी ही वरची व खालची बाजू महत्वाची ठरते. यामुळे प्रवाहाच्या वरच्या बाजूने आलेले पाणी प्रदूषित असते व आपल्या गावातील सांडपाणी त्यात मिसळून ते अधिक प्रदूषित बनते. अशा प्रकारे जसजसा प्रवाह पुढे सरकतो तसतसा तो अधिकाधिक प्रदूषित बनत जातो. पुणे शहरातून पाण्यावर प्रक्रिया न होताच ते पाणी नदीत सोडले जाते व त्याचा धोका उजनीसारख्या जलसाठ्यावर होतो याबद्दल वारंवार चर्चा होवून सुद्धा पुणेकर लोक आपल्या सवयी बदलत नाहीत व उजनी धरणातून जे जे लोक पाणी उचलतात त्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम जाणवतो. या थीममध्ये पाणी शुद्ध केल्याशिवाय नदीत सोडू नये असा संदेश मिळतो.
: 21व्या शतकातील पाणी :
पाणी प्रश्न ख-या अर्थाने 21व्या शतकाला भेडसावणार आहे. वाढती लोकसंख्या, पाण्याच्या पुरवठ्यात न होणारा बदल, शहरीकरणामुळे पाण्याची वाढती मागणी, नद्यात व तलावात वाढत जाणारे प्रदूषण, हवामानात होत असलेले बदल या प्रमुख समस्यांमुळे पाणी प्रशष्न किती कळीचा बनणार आहे याची जाणीव होवू शकेल. या शतकात पाण्याच्या खाजगीकरणाची चर्चाही वेग धरत आहे. अशाप्रकारे खाजगीकरण झाले तर सामान्य माणासाचे जीवन किती कठीण बनेल याची कल्पनाच केलेली बरी.

: पाणी आणि आरोग्य :
पाण्याचा व आरोग्याचा फारच जवळचा संबंध आहे. आजकाल तर जंगतिक संघटनांनी पाण्याची व्याख्याच बदलवून टाकली आहे. पाण्याला ते वॉश ( वॉटर इन रिलेशन टू सॅनिटेशन अँड हायजिन) या नावाने संबोधतात. पाणी हे कोणाशीही फारच लवकर मैत्री करीत असते - चांगल्याशी तसेच वाईटाशीही. जीवाणू आणि विषाणू पाण्याचा दर्जा अथवा गुणवत्ता घटवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. तलावातील, नद्यांतील अथवा भूजलातील प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. ते धोकादायक पातळी ओलांडण्याची वाट न पाहता आपण त्याची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्नशील असावयास हवे. नसता रोगराईचे थैमान बळावेल आणि त्याचा परिणाम मानवी स्वास्थ्यावर व स्वच्छतेवर झाल्याशिवाय राहणार नाही असा संदेश या थीमपासून देण्याचा प्रयत्न आहे.

2002 ची थीम: पाणी आणि विकास :
पाणी हे विकासासाठी आवश्यक असलेले एक संसाधन आहे. मानवाचा जो विकास झाला त्यासाठी पाणी हा एक महत्वाचा घटक ठरला आहे. शेतीसाठी सिंचन व्यवस्था असली तर शेतमालाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होते. शेती व्यवसायाला स्थैर्य व शाश्वतता येते. कारखान्यांना घर्षणामुळे जी उष्णता निर्माण होते ती कमी करण्यासाठी पाणी हा महत्वाचा घटक आहे. शिवाय ब-याच वस्तु तयार करतांना पाणी उपयोगी ठरत असते. एवढेच नव्हे तर पाणी दळणवळणाच्या द्ष्टीनेही सहाय्यभूत ठरते. माणसाच्या वैयक्तिक विकासासाठी पाणी आवश्यक ठरते. एकूण काय तर देशाची आर्थिक सुबत्ता टिकवून ठेवण्यासाठी पाण्याचे योगदान महत्वाचे आहे.

: पाणी सुखदायी भविष्य :
सध्या ज्या पद्धतीने आपण पाणी वापरतो आहोत त्यावरुन तरी आपले भविष्य अंध:कारमय दिसत आहे. पाण्याच्या मागणी व पुरवठ्यातील संतुलनच आपण गमावून बसलो आहेत. पाण्याची सतत वाढत जाणारी मागणी आपल्याला बेचैन करीत आहे. माणूस अगदीच ताळतंत्र सोडल्यासारखा पाण्याची मागणी वाढवित आहे. पण त्याचे पाण्याच्या पुरवठ्याकडे मात्र संपूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. शिवाय उपलब्ध असलेले पाणी प्रदूषित करणे हा त्याचा स्थयीभाव होत चालला आहे. त्यामुळे आधीच कमी असलेला जल पुरवठा अधिकच तोकडा पडत आहे. अशा परिस्थितीत आपल्याला आपले भविष्य सुरक्षित आणि सुखदायी बनवायचे असेल तर आपल्याला पाण्याकडे बघण्याचा दृषिटीकोन निश्चितच बदलावा लागेल.


: जीवनासाठी पाणी :
जीवनासाठी पाणी अत्यावश्यक असल्यामुळे 2005 ते 2015 या दशकात पाण्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्यासाठी योजना आखल्या जाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. पाण्याशी संबंधित वेगवेगळे प्रश्न या दशकात हाताळले जावेत व प्रत्येक सरकारने आपली पाण्यासंबंधात धोरणे स्पष्ट करावीत असे ठरविण्यात आले. रियो-डी-जानेरो परिषदेत अजेंडा 21 प्रमाणे जे जे ठरविण्यात आले त्या कामाची अंमलबजावणी या 10 वर्षांच्या कालखंडात करण्यात यावी असे सभासद राष्ट्रांना सांगण्यात आले.

पाणी आणि संस्कृती :
पाण्यामुळे संस्कृती जन्मते, विकसित पावते आणि फोफावते हे काळाच्या ओघात मानव जातीच्या लक्षात आलेले आहे. एवढेच नव्हे तर पाण्याकडे योग्य लक्ष पुरविण्यात माणसाने हयगय केली तर संस्कृती लयाला वा विनाशाकडे मार्गस्थ होते हेही माणसाला जाणवले आहे. आपल्या देशात तर आपण पाण्याला, जलसाठ्यांना, जल प्रवाहांना, नद्यांना देवत्व बहाल केले आहे. नद्यांना आपण मातृत्वाचा दर्जा दिला आहे. आपला विकास पाण्याच्या अस्तीत्वामुळेच झाला आहे याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मानवाने उचललेले हे पाऊल आहे. पाण्याला आपण तीर्थ मानतो. आपला दिवस पाण्याने सुरु होतो व पाण्यानेच संपतो. माणसाच्या आयुष्यातील सर्व महत्वाचे विधी पाण्याभोवती फिरत असतात. त्यामुळे सांस्कृतिक विकासात पाण्याचे स्थान अगाध आहे हे या थीमने स्पष्ट केले आहे.

पाण्याची दुर्मिळता :
जगाची लोकसंख्या सातत्याने वाढत असल्यामुळे दरडोई पाण्याची उपलब्धता घसरत चालली आहे याची जाणीव होवून पाणी हे दुर्मीळ होत चालले आहे हे थीम जगाच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जलसाठे स्थिर आहेत, त्यात कोणतीही वाढ अशक्य आहे, त्यामुळे पाणी जपून वापरण्यात यावे याची जाणीव समाजात निर्माण व्हावी या दृष्टीने प्रयत्न व्हावेत ही अपेक्षा या थीमद्वारे करण्यात आली आहे. 2008 ची थीम:आरोग्याला प्राधान्य धेणारे आंतरराष्ट्रीय वर्ष पाणी आणि आरोग्य यांचा फारच जवळचा संबंध आहे हे विसरुन चालणार नाही. चांगल्या आरोग्याचे 80 ते 90 टक्के प्रश्न हे शुद्ध, स्वच्छ पेयजलाशी निगडित आहेत असे आरोग्यशास्त्र म्हणते. आज जगातल्या 25 टक्क्याच्यावर लोकांना शुद्ध पेयजल उपलब्ध नाही असे म्हणतात. त्यामुळे वर्षभर विविध कार्यक्रम घेवून शुद्ध पेयजल आरोग्यासाठी कसे आवश्यक आहे ही बाब लोकांच्या मनावर बिंबवण्यात यावी अशी अपेक्षा ही थीम करते.


:पाण्याची गुणवत्ता :
पाणी हे कोणाशीही मैत्री करते हा पाण्याचा सर्वात मोठा दुर्गुण समजला जातो. नागरी भागात नदी नाल्यात सोडले जाणारे सांडपाणी, ग्रामीण भागात विहीरी खोदत असतांना जमिनीतील क्षार मिसळून अशुद्ध झालेले पाणी, कारखाने, शेती यातून बाहेर पडणारे रसायनयुक्त पाणी यामुळे पाण्याची गुणवत्ता संपूर्णपणे धोक्यात आली आहे. जगात पाणी मिळविण्यासाठी खोलखोल विहीरी खोदण्याची जणू काय स्पर्धाच लागली आहे. 1000 - 1500 फूट बोअर खणून पाणी मिळविण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. यामुळे काही देशात तर सायनाइड सारखे विषारी क्षार पाण्यात मिसळलेले आढळून आले आहेत. अशा पाण्याच्या सेवनामुळे जनता मरणाकडे वाटचाल करावयास लागली आहे. हे टाळण्यासाठी पाण्याची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्याक असल्याचे ही थीम सांगते.

शहरांसाठी पाणी :
गेल्या काही शतकांपासून नागरीकरणाच्या क्रियेने बराच वेग धारण केला आहे. यामुळे इतर विविध प्रश्नांबरोबर पाणी प्रश्नही निर्माण झाला आहे. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता व शुद्धता, समान पाणी वितरण, सांडपाणी व्यवस्थापन हे त्यातले महत्वाचे प्रश्न होत. शहरांची पाण्याची वाढती गरज ही शेतीसाठी जाचक ठरत आहे. शेतकरी आज त्याबद्दल अस्वस्थ आहेत व यातून कलह निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील सांडपाणी नदीनाल्यात सोडल्यामुळे प्रवाहाच्या खालच्या बाजूस अशुद्ध पाण्याचा पुरवठा ही चिंतेची बाब बनत चालली आहे. हे सर्व प्रश्न समाजाला कळावेत व त्यासाठी काही उपाययोजना व्हावी हा या थीमचा उद्देश आहे.

: पाणी आणि अन्नसुरक्षा :
वाढत्या लोकसंख्येला शाश्वत अन्नपुरवठा व्हावा यासाछी शेतीने अन्नेत्पादन वाढवून हे आव्हान पेलावे हे या थीमने जगासमोर मांडले आहे. यासाठी शेतीतील पाणी प्रश्न सोडवून धान्योत्पादन वाढविणे शक्य होईल याची काळजी प्रत्येक देशाने घेणे गरजेचे आहे जलसाठे वाढविणे, पाणी शेतक-यांना उपलब्ध करुन देणे, शेतक-यांनी त्या पाण्याचा विवेकाने वापर करुन प्रत्येक थेंबाचे रुपांतर अधिक धान्यात करावे म्हणजे अन्नसुरक्षा गाठणे शक्या होईल अशी या थीमकडून अपेक्षा आहे.

पाण्यासाठी सहकार्य :
1992 साली रियो डी जानेरो परिषदेत एकात्मिक जल व्यवस्थापनाचे महत्व विषद करण्यात आले होते. या संबंधात जागतिक सहकार्य वाढावे यासाठी वर्ल्ड वॉटर काउंसिल व ग्लोबल वॉटर पार्टनरशिप सारख्या संस्थांचा जागतिक पटलावर उदय झाला. समन्यायी पाणी वाटप होणे किती गरजेचे आहे हे या दोन संस्थांच्या कार्यपद्ओधीतीपासून स्पष्ट होते. हे सहकार्य जागतिक व राष्ट्रीय पातळीवर वृद्धिंगत व्हावे ही या थीमची अपेक्षा आहे. आपला समाज पाण्याबद्दल आवश्यक तेवढा जागृत नाही. अशा प्रकारच्या थीम्स घोषित केल्या जातात, जगामध्ये या थीम्स अनुसार कार्यक्रम घेतले जातात याची सर्वसामान्य माणसाला कल्पनाही नाही. एवढेच नव्हे तर 22 मार्चला जागतिक जलदिन साजरा होतो हेही लोकांना माहित नाही. या साठी जागृती करणे गरजेचे आहे. वर्तमान पत्रात लेख, प्रभात फे-या, जलदिंड्या या सारखे कार्यक्रम राबवून ही जनजागृती करण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करावे हीच या लेखाची अपेक्षा.

डॉ. दत्ता देशकर

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh